
चिपळूण : कोयना प्रकल्पातून (Koyna Project) १५ मार्च ते १४ मे २०२५ या दोन महिन्यात रेकॉर्डब्रेक अशी तब्बल ६९२.६८ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. कोयनेचे पाणी पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरू नये, यासाठी धरणातील शक्य तेवढे पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाताना कोयनेच्या पाण्यामुळे पूर येणार नाही, आलाच तर मोठे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.