एकिकडे रक्षाबंधनाचा उत्सव अन् दुसरीकडे चिमुकल्या भाऊ-बहिणीचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह...

राजेश कळंबटे
Tuesday, 4 August 2020

रत्नागिरी शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

रत्नागिरी : एकीकडे सोमवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा उत्साह असताना दुसरीकडे चिमुकल्या बहीण-भावाला कोरोनाने गाठले. अवघ्या आठ वर्षांची बहीण आणि सहा वर्षांच्या भावाचा कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. रक्षाबंधनाच्या दिवशीच दोन चिमुकल्या बहीण भावाला उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा- मंडणगडातील ही पाच धरणे ओव्हर फ्लो... -

रत्नागिरी शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. अशातच कोविड योद्धे म्हणून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण होऊ लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा- रत्नागिरीत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव , पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लागण... -

पोलीस लाईन येथे वास्तव्यास असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दोन लहान मुलांसह पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. रक्षाबंधन दिवशी या दोन चिमुकल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eight year old sister and six year old brother corona report positive in ratnagiri