esakal | नाकर्तेपणाचे खापर अधिकाऱ्यांवर: एकनाथ नाडकर्णी; केसरकरांनी राजीनामा देऊन घरी बसावे
sakal

बोलून बातमी शोधा

नाकर्तेपणाचे खापर अधिकाऱ्यांवर: एकनाथ नाडकर्णी

अलीकडेच आणलेला निधी आळशी व अकार्यक्षम अधिकाऱ्यामुळे खर्च झाला नाही, अशी खंत आमदार केसरकर व्यक्त करत आहेत.

नाकर्तेपणाचे खापर अधिकाऱ्यांवर: एकनाथ नाडकर्णी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग): आमदार दीपक केसरकर (MLA deepak kesarkar) आपल्या नाकर्तेपणाच खापर अधिकऱ्यावर फोडत आहेत. त्यांना घरी बसविण्याची भाषा करणाऱ्या केसरकरांनी स्वतः राजीनामा देऊन घरी बसावे. एखाद्या कार्यक्षम व्यक्तीला तरी काम करण्याची संधी मिळेल, अशी टीका भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी (eknath nadkarni) यांनी केली. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. अलीकडेच आणलेला निधी आळशी व अकार्यक्षम अधिकाऱ्यामुळे खर्च झाला नाही, अशी खंत आमदार केसरकर व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: सिंधुदुर्ग जिल्ह्यात उदयापासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण

सासोली येथील शिवसंपर्क अभियानाच्या मेळाव्यात पालकमंत्र्याकडे त्यांनी अधिकाऱ्यांना घरी बसवा, अशी विनंती केली होती. याबाबत नाडकर्णींनी म्हटले आहे, की "केसरकर जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी नवनवीन तंत्र आणतात. आता आपल्या अपयशाच खापर ते अधिकाऱ्यांवर फोडत आहेत. केसरकर तुम्ही मंत्री म्हणजे मालक होता. आपल्या हाताखालच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याची जबाबदारी तुमची होती. त्यांनी कामं केली नाहीत म्हणजे तुम्ही बेजबाबदार होता. आता त्यांच्या अकार्यक्षमतेवर बोलून त्यांना घरी पाठवण्याची धमक्या देत आहात. ‘प्रेमाने जग जिंकता येत’, असा सुविचार तुम्हीच या प्रशासनबद्दल सांगत होता. मग मंत्री असताना तुम्ही प्रेमाने वागून काम का करून घेतली नाही.

हेही वाचा: सिंधुदुर्ग पुन्हा चौथ्या टप्प्यात; हे राहणार सुरु, हे बंद

जनतेला जाऊन विचारा प्रेमाने बोलून साधा सातबारा उतारा तरी शेतकऱ्याला मिळतो का? आज अधिकाऱ्यांनी काम केली नाहीत म्हणून दोडामार्ग तालुक्यातील जनता हाल सहन करतेय. तुमच्या अकार्यक्षमतेचा रोज पंचनामा जनतेतून होतोय. म्हणूनच गेल्या निवडणुकीत तुम्हाला तालुक्यातून शुल्लक मताधिक्य मिळाल होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेऊ शकलो नाही हे प्रामाणिकपणे कबूल करा. नवीन ढोंगबाजी थांबवून मोठ्या मनाने आमदारकीचा राजीनामा द्या. पुरे झाली आता तुमची शाब्दिक सेवा चाकरी. तुमच्या फसव्या आश्‍वासनबाजीतून जनतेला मोकळ करा.

हेही वाचा: सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटींचा मदतनिधी!

बांदा-दोडामार्ग-आयी रस्ताच पुरावा

पत्रकात म्हटले आहे, की कोट्यवधी निधी आणला म्हणणाऱ्या केसरकरांच्या अकार्यक्षमतेचा पुरावा देण्यासाठी बांदा-दोडामार्ग-आयी रस्ताच पुरेसा आहे. या रस्त्याची दुरवस्था केसरकर मंत्री असल्यापासून सुरू आहे. साधा हा रस्ता दुरुस्त करणे त्यांना जमले नाही. शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यालाही या रस्त्यावरून प्रवास करताना यातना होत असतील. जे कार्यकर्ते तुमच्यासाठी राबतात रस्त्यावरून जाताना त्यांचीही बोलती बंद होत असेल. त्यामुळे तुमच्या कामाचा प्रचार तरी कसा करतील हे कार्यकर्ते?

loading image