देवगड - महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. येथील संस्कृती, परंपरा पुढे न्यायची आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना विकासामध्ये कधीही भेदभाव केला नाही. जिल्ह्याचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी काम करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणकेश्वर येथे दिली.