‘युती’चा ‘महाविकास’ला दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election of Sawantwadi buying and selling union Won 15 seats

‘युती’चा ‘महाविकास’ला दणका

सावंतवाडी : सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आज महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनेलने निर्विवाद विजय मिळविला. त्यांनी ठाकरे सेनेच्या सहकार वैभव पॅनेलचा १५-० असा दारुण पराभव केला. श्री देव पाटेकर सहकार परिर्वतन पॅनेलचे चौदा उमेदवार विजयी घोषित झाले. तर दत्ताराम कोळंबेकर बिनविरोध निवडून आले होते.

विजयी उमेदवार असे (कंसात मते) - संस्था गट - प्रवीण देसाई (२७), आत्माराम गावडे (२७), दत्ताराम हरमलकर (२७), प्रभाकर राऊळ (२६), रघुनाथ रेडकर (२५), प्रमोद सावंत (२६). व्यक्ती गट - प्रमोद गावडे (३२५), शशिकांत गावडे (२८६), ज्ञानेश परब (२९६), विनायक राऊळ (२७८). महिला - अनारोजीन लोबो (३२१), रेश्मा निर्गुण (३२०). इतर मागास वर्ग - नारायण हिराप (३३२), अनुसूचित जाती जमाती - भगवान जाधव (३३९). ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी - सेलेस्तीन डिसोझा (१२८), अरुण गावडे (१३८), गोपाळ नाईक (११६), सीताराम राऊळ (११९). महिला - रिया चराठकर (१३८), शिल्पा केसरकर (१५४). मागासवर्ग- दशरथ मळगावकर (१४९). संस्था गट - नीलेश परब (९), रमेश गावकर (१२), रवींद्र म्हापसेकर (११), प्रमोद परब (१०), शिवाजी परब (९), सखाराम ठाकूर (१३).

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर व आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली, तर जिल्हा बँक संचालक महेश सारंग, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी व माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली. प्रचार प्रारंभावेळीच युतीचे १५ उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. तो आज खरा ठरला. विजयानंतर भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, चिटणीस महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, अजय गोंदावळे, राजू परब, अॅड. परिमल नाईक, मनोज नाईक, आनंद नेवगी, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, विकी आजगावकर, संदीप नेमळेकर, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, बाबा राऊळ, विनोद सावंत, मधू देसाई, जितेंद्र गावकर, संतोष गांवस, संजय शिरसाट, नीळकंठ बुगडे, दिलीप भालेकर, तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे बबन राणे, गजा नाटेकर, अॅड. नीता कविटकर यांसह भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, संस्था गटातून ३९ पैकी ३९, व्यक्ती गटातून ९९८ पैकी ४९५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. कळसूरकर इंग्लिश स्कूल केंद्रावर सकाळी आठ ते सायंकाळी चारपर्यंत मतदान झाली. श्री. केसरकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्‍यांचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले. सायंकाळी पाचला मतमोजणीला सुरू झाली. सायंकाळी सहाला निकाल जाहीर झाला.

टॅग्स :KokanelectionSawantwadi