येणारे वर्ष सिंधुदुर्गसाठी निवडणुकांचे, राजकीय उलथापालथ शक्य

Elections in Sindhudurg next year
Elections in Sindhudurg next year

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी 2021 हे निवडणुकीचे वर्ष असेल यात राजकीय उलथापालथीही पाहायला मिळतील. 

देशभरातील निवडणुकीचा कार्यक्रम अनिश्‍चित कालावधीसाठी पुढे ढकलला आहे. निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतदार याद्यांचे कामही लांबणीवर पडले आहे. जानेवारी 2020 मधील मतदार याद्या अद्ययावत झालेल्या नाहीत. ही प्रक्रियाही लाभलेली आहे. त्यातच गेल्या सहा महिन्यांमध्ये मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही अनिश्‍चित कालावधीसाठी पुढे ढकलल्या आहेत. जोपर्यंत कोरोनाचे संकट नियंत्रणात येत नाही आणि परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत निवडणुका घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सध्या मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर अर्थात ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आला आहे. 

आता निवडणुकीचा हा बार पुढच्या वर्षी उढण्याची शक्‍यता असून एकत्रित सगळ्या निवडणुका होतील, अशी शक्‍यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर राजकीय उलथापालथी पाहायला मिळण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात सध्या राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. सत्ताधारी आणि विरोधक, असा कलगीतुरा अधुनमधून सुरू आहे. आता ही धार पुढच्या कालावधीत अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. 

कोरोना आणि त्यावरील उपचार हे मोठे संकट पुढे आहे. तसेच मराठा समाजाचे आरक्षण हा मुद्दाही पुढच्या कालावधीमध्ये तापण्याची शक्‍यता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि देशातील मोदी सरकार यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असल्याने याचे दूरगामी परिणाम जिल्हास्तरावर पाहायला मिळणार आहेत. विकास प्रक्रियेला केंद्र आणि राज्य स्तरावरूनच ब्रेक लागला आहे. त्यामुळे पुढच्या कालावधीत विकास प्रक्रियेचा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुर्वी हे मुद्दे अगदी तीव्रपणे पुढच्या काळात मांडले जाण्याची शक्‍यता आहे. 

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य मतदाराला आपल्या बाजूने खेचण्यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते कामाला लागण्याची शक्‍यता आहे. याचे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढच्या कालावधीत होऊ घातल्यास किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत निवडणूका होतील, अशी शक्‍यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत बहुतांशी व्यवहार सुरू झाले असले तरी सार्वजनिक वाहतूक सुरळीत झालेली नाही. शाळा, महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. गेल्या वर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही प्रलंबित आहेत. नवीन वर्षाच्या प्रवेश प्रक्रियाही लाबंल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष बदलण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. शाळा महाविद्यालयांचे वेळापत्रक निश्‍चित झाल्यानंतर निवडणूकांचे वेळापत्रक निश्‍चित होईल. कायदा आणि सुव्यवस्था, परिस्थिती पाहून पुढच्या वर्षी निवडणुका घेतल्या जातील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकत्रित निवडणुका होतील, अशी दाट शक्‍यता आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संपणाऱ्या मुदती अशा 
- कसाई-दोडामार्ग नगरपंचायत - नोव्हेंबर 2020 
- वाभवे-वैभववाडी नगरपंचायत - नोव्हेंबर 2020 
- कुडाळ नगरपंचायत - मे 2021 
-वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण नगरपालिका - डिसेंबर 2021 
- देवगड- जामसंडे नगरपंचायत - डिसेंबर 2021 
- कणकवली नगरपंचायत- मे 2023 

ग्रामपंचायतीच्या मुदती 

ऑगस्ट ते डिसेंबर 2020- 71 
डिसेंबर 2021 - 4 
नोव्हेंबर 2022 - 325 
डिसेंबर 2023 - 25 
डिसेंबर 2024 - 5 
एकूण ग्रामपंचायती- 430  

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com