विजेच्या तारांच्या स्पर्शाने दोन गायींचा मृत्‍यू; शेतकरीही जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या तारांच्या स्पर्शाने दोन गायींचा मृत्‍यू ; शेतकरीही जखमी

विजेच्या तारांच्या स्पर्शाने दोन गायींचा मृत्‍यू ; शेतकरीही जखमी

कणकवली (सिंधुदुर्ग) : तुटलेल्‍या विद्युतभारीत तारांचा स्पर्श झाल्‍याने दोन गायी जागीच मृत झाल्या तर बैलाला सोडविण्याच्या प्रयत्‍नात शेतकरी किरकोळ जखमी झाला. तसेच बैलाला वाचविण्यातही यश आले. तालुक्‍यातील पियाळी गावातील बौद्धवाडी येथे सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

तालुक्‍यातील पियाळी (बौद्धवाडी) येथील शेतकरी विश्वनाथ विश्राम कदम हे सकाळी सातच्या सुमारास आपली गुरे चरावयास घेऊन तेथील माळरानावर जात होते. यात तुटलेल्‍या विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्‍याने त्‍यांच्या दोन गायी जागीच मृत झाल्या. या तारामध्ये बैल देखील अडकला होता. ही बाब लक्षात येताच काठीच्या साहाय्याने विद्युत तार बाजूला करून विश्‍वनाथ कदम यांनी बैलाला वाचवले. त्‍याचवेळी त्‍यांनाही विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्‍याने ते दूर फेकले गेले. सुदैवाने त्‍यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. या घटनेची माहिती स्थानिकांना दिल्‍यानंतर महावितरणशी संपर्क साधून पियाळी भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर दुपारनंतर तुटलेल्या वीज तारा बाजूला करण्यात आल्या.

हेही वाचा: दोन आजाराशी झुंज देत चढली 'ती' लग्नाच्या बोहल्यावर

दरम्‍यान, दोन गायी दगावल्‍याने विश्‍वनाथ कदम यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्‍यामुळे महावितरणने कदम यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती संतोष कानडे यांनी आज केली.

Web Title: Electric Wire Shock Two Cows Died In Sindhudurg Incident At Piyali Baudhwadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top