esakal | पूरग्रस्तांच्या वीज बिल प्रश्नाला बगल देत ऊर्जामंत्र्यांचा काढता पाय
sakal

बोलून बातमी शोधा

पूरग्रस्तांच्या वीज बिल प्रश्नाला बगल देत ऊर्जामंत्र्यांचा काढता पाय

पूरग्रस्तांच्या वीज बिल प्रश्नाला बगल देत ऊर्जामंत्र्यांचा काढता पाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चिपळूण : महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी चिपळूण दौऱ्यावर (chiplun flood) आलेल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांना गुरुवारी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पूरग्रस्तांच्या वीजबिलाविषयी छेडण्यात आले. मात्र, या प्रश्नाला बगल देत त्यांनी काही क्षणातच तेथून काढता पाय घेतला. यामुळे चिपळूण पत्रकार संघटनेने निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा: दिलासादायक; रत्नागिरीचा पॉझिटिव्हिटी दर घटला

चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी महापुराने थैमान घालून अतोनात नुकसान केले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राऊत आले होते. त्यांनी बाजारपेठेसह परिसराची पाहणी केली. त्यानंतर धवल मार्ट येथील सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. यानंतर पत्रकार परिषद झाली. महापुरात शेतकरी व व्यापारी नेस्तनाबूत झाल्याने वीजबिलाविषयी (electricity bill) त्यांना दिलासा दिला जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, या प्रश्नावर त्यांनी कोणतेही उत्तर न देता त्यांनी सभागृह सोडले. त्यानंतर काही पत्रकारांनी त्यांना कोयनेतून मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असलेल्या अवजलाविषयी विचारणा केली. मात्र त्यांनी तेथेही जलसंपदा विभागाकडे बोट दाखवून उत्तर देणे टाळले.

हेही वाचा: कळणे खनिज प्रकल्पाचा फुटला बांध ; शेतीचे लाखोंचे नुकसान

अनेक प्रश्न अनुत्तरित

चिपळूण दौऱ्यावर आलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून शहरवासीयांना दिलासादायक पॅकेज मिळेल, अशी अपेक्षा होती. यामध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांना वीजबिलात सूट, पूरपरिस्थितीत विजेमुळे मृत झालेल्या व्यक्तींना भरपाई, कोयनेतून पूरपरिस्थितीवेळी सोडण्यात येणारे अवजल, भुयारी विद्युतलाईन आदी अनेक प्रश्न या वेळी अनुत्तरितच राहिले.

loading image
go to top