esakal | अन् अभियंता, वायरमनची पुराच्या पाण्यात उडी!
sakal

बोलून बातमी शोधा

अन् अभियंता, वायरमनची पुराच्या पाण्यात उडी!

अन् अभियंता, वायरमनची पुराच्या पाण्यात उडी!

sakal_logo
By
राजेंद्र बाईत

राजापूर : सहाय्यक अभियंता चिवटे, वायरमन गुरव यांनी एकमेकांच्या पायाला दोरी बांधली अन् थेट पुराच्या पाण्यात उडी मारली. पुराच्या (flood) पाण्याच्या प्रवाहाचा वेग जोरात असतानाही पोहत जात ते पाण्याखाली असलेल्या डीपीच्या ठिकाणी जाऊन पोहचले. थोडा वेळ पोहत थांबत, त्या लाईनचा फॉल्ट काढला आणि खंडित झालेला पुरवठा पूर्ववतपणे सुरू केला. हा प्रकार घडला राजापूर शहरात.

पूरस्थितीमध्ये लाईन फॉल्टी झाल्याने शहरातील मच्छीमार्केट परिसरातील वीजपुरवठा काल (१२) सायंकाळी खंडित झाला होता. त्यातच, त्या परिसरातील डीपी (DP poll) पुराच्या पाण्याखाली (flood in kokan) गेला होता. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन फॉल्टी झालेल्या लाईनची दुरुस्ती करणे गरजेचे होते; मात्र, मच्छीमार्केट परिसरामध्ये पुराचे पाणी असल्याने त्या ठिकाणी सहजासहजी जाणे शक्य नव्हते; दुरुस्तीही करणे गरजेचे होते. अशा स्थितीमध्ये सहाय्यक अभियंता चिवटे, वायरमन गुरव यांनी एकमेकांच्या पायाला दोरी बांधली अन् थेट पुराच्या पाण्यात उडी मारली.

हेही वाचा: घराचं स्वप्न महागलं; 'क्रेडाई'च्या अभ्यासात नवा निष्कर्ष समोर!

पुराच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग जोरात असतानाही पोहत जात, ते पाण्याखाली असलेल्या डीपीच्या ठिकाणी जाऊन पोहचले. थोडा वेळ पोहत थांबत, त्या लाईनचा फॉल्ट काढला आणि खंडित झालेला पुरवठा पूर्ववतपणे सुरू केला. केंगार यांनीही असेच धाडस करून रात्री उशिरा कोंढेतड परिसरातील वीजपुरवठा सुरू केला.

गळाभर पाण्यातून ओढला खटका

आणखी एका प्रसंगात मोसम येथील वीजखांब पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढलेला होता. त्या ठिकाणचा खटका ओढल्याशिवाय त्या परिसरातील अन्य गावातील वीजपुरवठा कार्यान्वित होणार नव्हता. अशा स्थितीमध्ये कर्मचारी महाडीक गळाभर असलेल्या पुराच्या पाण्यातून काही काळ चालत तर काही वेळ पोहत, त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणचा खटका ओढला. त्यामुळे मोसम आणि त्या परिसरातील गावे प्रकाशित झाली.

सर्व थरातून कौतुक

पुराच्या पाण्यामध्ये पोहत जाऊन तर काही वेळा गळ्याभर पाण्यातून चालत जात पूरस्थितीने हैराण झालेल्या राजापूरवासीयांची घरे प्रकाशाने उजळण्यासाठी वीजवितरण विभागाने घेतलेले कष्ट, वेळप्रसंगी पत्करलेला धोका म्हणजे कामाप्रती आणि जनतेप्रती असलेली निष्ठा, याचा पडताळा होता. सहाय्यक अभियंता सी. एस. चिवटे, वायरमन संदेश गुरव, किशोर चंदुरकर, रमेश केंगार, मोसमचे वायरमन रूपेश महाडीक यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

हेही वाचा: चक्रीवादळांचा धोका ; रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्रिसूत्री

"वीजपुरवठा कार्यान्वित करण्यासाठी पुराच्या पाण्यात पोहत जाणे धोक्याचे होते. कदाचित जीवावरही बेतले असते. हे जरी खरे असले तरी वीजपुरवठा सुरू करण्याची आपली जबाबदारीही होती. या जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्य पालनातून पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे धाडस केले. त्याला सहकाऱ्‍यांनीही मदत केली."

- सी. एस. चिवटे, सहाय्यक अभियंता, वीजवितरण विभाग

loading image