तिलारी खोऱ्यात हत्ती आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

दोडामार्ग - तिलारी खोऱ्यातील हत्तींचा उपद्रव वाढला आहे. बांबर्डे, घाटीवडे परिसरात या कळपाने अक्षरशः धुडगूस सुरू केला आहे. तिलारी खोऱ्यातील हत्तींचा उपद्रव थांबता थांबत नाही. बांबर्डे घाटीवडे परिसरात गेल्या दोन रात्रीत हत्तीच्या कळपाने लाखो रुपयांचे नुकसान केले. 

शनिवारीपासून हा प्रकार सुरू आहे. शनिवारी सायंकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान एक टस्कर चक्क तिलारी वीजघर बेळगाव रस्त्यालगत तासभर उभा होता. एसटीसह अनेक गाड्या थांबवून प्रवाशांनी हत्तीच्या वेगवेगळ्या लीला पाहिल्या. एकीकडे टस्कर रस्त्यावर दर्शन देत होता तेव्हा दुसरा तीन हत्तींचा कळप डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नदीत सचैल डुंबत होता.

त्या परिसरात पाच हत्तींचा वावर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केळीच्या बागांना लक्ष्य केले आहे. केळीसह कवाथे, माड, चवळी, पालेभाजी, नाचणी आणि भातपिकाचेही नुकसान सुरूच ठेवले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोमवारी रात्री तेथील ऑल्विन लोबो यांच्या सुमारे आठशे केळी हत्तींनी भुईसपाट केल्या. त्यात त्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर काल (ता. १६) रात्री दौलत राणे, भीमराव राणे आणि शिवराम राणे यांच्या केळी बागायतीचे मोठे नुकसान केले. हत्तींनी शेतकऱ्यांचे लागते माडही जमीनदोस्त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elephant attack in Tilari region