

Rising Elephant Menace
sakal
दोडामार्ग: जिल्ह्यात दिर्घकाळ वास्तव्य असलेल्या हत्तींमुळे शेकडो शेतकरी देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली. हत्ती हल्ल्यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले. आतापर्यत या हत्तींच्या उपद्रवापासून सुटका व्हावी म्हणून अनेक आंदोलने, उपोषणे झाली. हत्ती पकड मोहीम पुन्हा एकदा राबवण्याच्या हालचालीही सुरु झाल्या; मात्र हत्तींना तिलारी जंगलात सोडावे, असा नवा विचार पर्यावरणप्रेमींकडून पुढे येऊ लागला आहे.