पंधरामाड येथे समुद्राचे अतिक्रमण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

रत्नागिरी - मिऱ्याच्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याची पुरती वाताहात झाली आहे. समुद्राच्या उधाणामुळे पंधरामाड येथील बंधाऱ्यासह सुमारे 30 ते 35 फुटाचा अर्धा रस्ताच समुद्राने गिळंकृत केला आहे. तेथील सार्वजनिक शौचालयापर्यंत समुद्र आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नागिरी - मिऱ्याच्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याची पुरती वाताहात झाली आहे. समुद्राच्या उधाणामुळे पंधरामाड येथील बंधाऱ्यासह सुमारे 30 ते 35 फुटाचा अर्धा रस्ताच समुद्राने गिळंकृत केला आहे. तेथील सार्वजनिक शौचालयापर्यंत समुद्र आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात बुधवारी (ता. 31) गटारी आमावस्या असल्याने आणखी धोका निर्माण झाल्याने रहिवाशांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना म्हणून भराव टाकण्यास सुरवात केली आहे. 

मिऱ्या येथील साडेतीन कि. मी. च्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे "येरे माझ्या मागल्या' या म्हणीप्रमाणे रडगाणे सुरूच आहे. मिऱ्या बंधाऱ्यावर कायमस्वरूपी उपययोजना कराव्यात, यासाठी 26 जानेवारीला आंदोलन छेडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने ग्रामस्थ येऊन उपाययोजनेबाबत पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला जाब विचारला होता. त्यांच्यासह स्थानिक आमदार उदय सामंत यांनी प्रयत्न केल्यामुळे केंद्र शासनाने मिऱ्या बंधाऱ्याच्यासाठी 190 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

टेट्रापॉड टाकून कायमस्वरूपी बंधारा बांधण्यात येणार आहे. मुसळधार पाऊस व अजस्र लाटांमुळे पंधरामाड येथील बंधारा आणि रस्ता वाहून गेला आहे. सोमवारच्या भरतीमध्ये तर सुमारे 30 ते 35 फुटाचे भगदाड पडले आहे. बंधाऱ्यासह पालिकेच्या मालकीचा अर्धा रस्ता वाहून गेला आहे. तेथील सार्वजनिक शौचालयापर्यंत समुद्र आला आहे. प्रशासनाने तत्काळ उपयायोजना म्हणून भराव टाकण्याचे काम सुरू झाले आहे. 

बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपये खर्च 
धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे दर्जेदार काम न झाल्याने दरवर्षी बंधारा अनेक ठिकाणी वाहून जातो. तेच आता पुन्हा पंधरामाड येथे घडले आहे. बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून ते पाण्यात गेले आहेत. थातुरमातूर काम केले जाते आणि पावसाळ्यात तो पुन्हा वाहुन जातो. पुन्हा बंधारा दुरुस्तीचे काम निघते. 

""पूर्वी आमच्यापासून सुमारे 1 कि.मी. समुद्र आत होता. मिरकरवाडा येथे घालण्यात आलेल्या ब्रेकवॉटर वॉलमुळे समुद्राचा प्रवाह मिऱ्याकडे वळला आहे. त्यामुळे समुद्राचे एवढे अतिक्रमण झाले आहे. यावर योग्य उपाययोजना न केल्यास समुद्राचे पाणी वस्तीत येण्याचा धोका आहे.'' 
- बी. ए. कांबळे
, स्थानिक रहिवासी 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment issue in Pandharamad