शूटिंग करणाऱ्यां तोतया पत्रकाराला बेदम चोप.....

Engineer Push In Chiplun Municipality Kokan Martahi News
Engineer Push In Chiplun Municipality Kokan Martahi News
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूण पालिकेकडे माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती न मिळाल्याने मुंबईतून आलेल्या एका नागरिकाने आज पालिकेत धिंगाणा घातला. बांधकाम विभागातील अभियंत्याला धक्काबुकी केली. त्याचा राग धरत जमावाने त्या नागरिकाला चांगलाच चोप दिला.

मोबाईलवर शूटिंग केल्यामुळे गोंधळ

आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान हा प्रकार पालिकेत घडला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार येथील रणजिता ओतारी यांनी शहरातील रुग्णालयांना दिलेल्या परवानगीबाबत पालिकेकडे विस्तृत माहिती मागितली होती. ओतारी यांनी नेमकी कोणती माहिती हवी आहे, त्याबाबत 
 अधिकाऱ्यांना योग्य खुलासा झाला नाही. त्यामुळे ओतारी यांना समक्ष भेटून माहिती मागण्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले होते. आज सकाळी ११ वाजता ओतारी पालिकेत आल्या. त्यांच्यासोबत आनंद मेस्त्री नामक व्यक्ती होती.


बांधकाम विभागातील अभियंता परेश पवार शहरात सुरू असलेल्या कामाच्या पाहणीसाठी गेले होते. ते साडेअकराच्या दरम्यान पालिकेत दाखल झाले. ओतारी व मेस्त्री यांनी पवार यांची भेट घेतली. ओतारी व पवार यांच्यात चर्चा सुरू असताना मेस्त्री यांनी मोबाईलवर शूटिंग करण्यास सुरवात केली. पवार यांनी त्याला अडविले असता मी पत्रकार असल्याचे मेस्त्री यांनी सांगितले. त्यानंतर पवार आणि मेस्त्री यांच्यात वादावादी झाली.

मेस्त्री गेला पळून

दोघांनी एकमेकांना धक्काबुकी केल्यानंतर मेस्त्री पालिकेतून पळून गेला. अभियंता पवार यांना धक्काबुकी झाल्याचे समजल्यानंतर पालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी एकवटले. तेथे जमाव जमला. नंतर मेस्त्रीचा शोध घेण्यात आला. गुहागरबायपास मार्गावर मेस्त्री भेटल्यानंतर त्याला पुन्हा पालिकेत आणण्यात आले. तेथे जमावाने मेस्त्रीचा समाचार घेतला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मेस्त्री आणि पवार यांनी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते. 

दैनंदिन कामकाजावर परिणाम
बांधकाम अभियंत्याला मारहाण झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. शहरातील सामाजिक कार्यकर्तेही पालिकेत दाखल झाले होते; मात्र मारहाणीचे प्रकरण पोलिस ठाण्यात गेल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठले. पालिकेतील कर्मचारीही पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. त्याचा परिणाम पालिकेतील दैनंदिन कामकाजावर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com