रत्नागिरीत तब्बल २६३ शाळांनी घेतला 'हा' निर्णय...

Tobacco Free School In Ratnagir Kokan Marathi News
Tobacco Free School In Ratnagir Kokan Marathi News
Updated on

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ३,३०२ पैकी ९४५ शाळांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. आतापर्यंत २६३ शाळा तंबाखूमुक्‍त करण्यात यश आले आहे.

 या अभियानात अकरा निकष ...
शालेय विद्यार्थी तंबाखूपासून दूर राहावे, तंबाखूचे दुष्परिणाम त्यांच्यावर होऊ नयेत, तंबाखूसाठी होणाऱ्या दुर्धर आजारापासून विद्यार्थी दूर राहावे, या हेतूने या अभियानाची सुरवात करण्यात आली. २००९ मध्ये सलाम मुंबई फाऊंडेशनने राज्यातील माध्यमिक, प्राथमिक शाळांमध्ये हे अभियान राबविले. गतवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक, जिल्हा परिषद शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. त्यात रत्नागिरीतील शिक्षकांचाही समावेश होता. या अभियानांतर्गत अकरा निकष शाळांना देण्यात आले होते.

तंबाखूमुक्ती प्रबोधन

या अभियानात शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेत तंबाखू सेवनास बंदी असल्याची नोटीस काढावी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांना याबाबत माहिती देण्यासाठी नोटीसचे वाचन, शाळेच्या गेटजवळ नोटीस लावावी, शाळेत नियंत्रण समितीची स्थापना करावी. तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायदा काय आहे, याची माहिती देण्यासाठी शाळेत फलक लावून तंबाखूमुक्त शाळा यावर विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र, पथनाट्य, निबंध स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com