"कणकवली शहरांमध्ये एक नियम आणि सावंतवाडी शहरामध्ये वेगळा नियम असे का "...?

शिवप्रसाद देसाई
Monday, 27 July 2020

नागरिकांना पालिका प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू घरपोच द्यावे....

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : शहरातील चितार आळी परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर सदरचा भाग कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे मात्र शंभर मिटरच्या अंतरामध्ये तफावत असून शंभर मिटरच्या बाहेरच्या नागरिकांनाही प्रशासनाने वेठीस धरले आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांना पालिका प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू घरपोच द्यावे अन्यथा वेठीस धरु नये अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याजवळ केली आहे.

सावंतवाडी शहरात चितारआळी भागात दोन दाम्पत्य कोरोना पाॅझिटिव्ह आल्यानंतर तात्काळ सदरचा भाग कंन्टेमेंट झोन जाहीर केला होता. आज त्या दाम्पत्याच्या जवळचेच नातेवाईक कोरोना पाॅझिटिव्ह मिळाले आहेत असे असतांनाही पालिका प्रशासनाने शंभर मिटरचा भाग कंन्टेमेंट झोन जाहीर करतांना त्या अंतरामध्ये तफावत ठेवली आहे. त्यामुळे शंभर मिटरच्या बाहेरच्या नागरिकांनाही वेठीस धरले जात आहे.

हेही वाचा- प्रकल्प नको तर, जनतेला सेना नको  कोणी दिला इशारा वाचा.... -

याबाबत श्री भोगटे यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले असून पालिका प्रशासनाने कंटेनमेंट झोन मध्ये तफावत न ठेवता चारही बाजूने सारखे अंतर ठेवावे अन्यथा त्या भागातील नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात कंटेनमेंट झोन केलेला भाग हा बाजारपेठेचा असून त्यामध्ये अनेक व्यवसायिक आहेत आज सणासुदीचे दिवस चालू आहेत तसेच सणाच्या दिवसात या भागात छोटे-मोठे व्यवसाय करणारे तसेच अनेक होलसेल व्यापारी सोनार व कापड व्यवसायिक आहेत .म्हणून मात्र कंटेनमेंट झोनमुळे या भागातील व्यवसायिक लोकांचे मोठे नुकसान झाले आहेत.

प्रशासनाने या सर्वांचा विचार करून पहा तुमच्या घरात कोरोणा रुग्ण अजून आला आहे त्या घरा पुरतेच कंटेनमेंट झोन करावे. आज कुडाळ कणकवली शहरांमध्ये घरा पुरतीच कंटेनमेंट झोन केले जात असतांना सावंतवाडी शहरामध्ये वेगळा नियम का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला असून कंटेनमेंट झोन मधील तफावत दूर करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा- ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी ६६ जणांना कोरोनाची लागण तर कोरोनाने प्रसिद्ध वैद्य डॉक्टरांचा मृत्यू... -

चितारआळी परिसरामध्ये डायबिटीस तसेच इतर आजाराचे पेशंट आहेत त्यांना वेळच्या वेळी औषधे देणे गरजेचे आहेत मात्र ही औषधे आणण्यासाठीही आणि पोलिसांकडून आडकाठी केली जाते शिवाय काही घरांमध्ये लग्नकार्य नियोजित आहे त्यांना सामान खरेदीसाठीही बाहेर पडण्यास दिले जात नाही त्यामुळे येथे लोकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे या सर्वांचा विचार करून प्रशासनाने यातून मार्ग काढावा अशी मागणी श्री भोगटे यांनी मुख्याधिकारी त्यांच्याजवळ केली आहे.

संपादन - अर्चना बनगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Essentials delivered at home Former corporator Suresh Bhogte demand for Municipal administration in sawantwadi