कोजागिरीच्या रात्री शिवसेनेची धावपळ

On the evening of Kojagiri Purnima BJP leader Ravindra Chavan suddenly met Rahul Pandit
On the evening of Kojagiri Purnima BJP leader Ravindra Chavan suddenly met Rahul Pandit

रत्नागिरी :  भाजपचे माजी मंत्री प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी ऐन कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राहूल पंडित यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना पेव फुटले. त्यानंतर गेले अनेक दिवस शिवसेनेच्या लेखी दुर्लक्षित असलेले पंडित पुन्हा प्रकाशात आले. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही पंडित शिवसेनेत जाणार नाहीत असा विश्‍वास व्यक्त केला आहे.


थेट नगराध्यक्षपदाच्या पहिल्याच निवडणुकीत उच्चशिक्षिकत आणि पारदर्शी अशा राहूल पंडित यांनी शिवसेनेकडून निवडणुक लढवत विजय संपादित केला होता; मात्र अडिच वर्षानंतर निवडणुकीवेळी दिलेली आश्‍वासनं पुर्ततेसाठी पंडित यांना नगराध्यक्षपदावरुन राजीनामा द्यावा लागला. 


ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या घटनांमुळे राहूल पंडित यांना तिन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवून नगराध्यक्षपदाचा भार तत्कालीन उपनगराध्यक्ष बंड्या साळवींकडे सोपवण्यात आला. त्यावेळी पंडित यांनी भैरी देवीच्या चरणी राजीनामा पत्र सादर केल्यामुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली होती. यामध्ये शिवसेना बॅकफूटवर जाऊ लागली होती. अनेक विकासकामे रखडल्याचा ठपकाही शिवसेनेवर बसलेला होता. सहा महिन्यानंतर पंडित यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात आला. त्यानंतरच्या पोट निवडणुकीत शिवसेनेचे बंड्या साळवी नगराध्यक्षपदी निवडून आले; परंतु पढील वर्षभरात राहूल पंडित शिवसेनेच्या राजकीय पटलावर कुठेच दिसत नव्हते.


रत्नागिरी शहरातील पाणी प्रश्‍न, नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम, मोकाट गुरे हे प्रश्‍न ऐरणीवर आलेले होते; परंतु कोरोना टाळेबंदीमुळे या सर्वच प्रश्‍नांना बगल दिली गेली. सभागृहात शिवसेनेचे प्राबल्य असल्यामुळे विरोधी पक्षात बसलेले भाजपा दुर्लक्षित होते. गेले सहा महिने शिवसेनेच्या दुर्लक्षित नेत्यांना आपलेसे करण्याच्यादृष्टीने भाजपकडूनही प्रयत्न सुरु होते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनी अचानक राहूल पंडित यांची भेट घेतली. त्यांचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरले झाले आणि पंडित भाजपवासी होणार अशी चर्चा सुरु झाली. या प्रकारामुळे अनेक शिवसैनिकांना धक्का बसला. नगराध्यक्ष कार्यकालात त्यांच्यावर विकासकामे थांबल्याचा ठपका होता; मात्र पारदर्शक कारभार ही छबी अजुनही कायम आहे. चव्हाण यांच्या भेटीनंतर दुर्लक्षित पंडित हे पुन्हा शिवसेनेच्या पटलावर दिसू लागले. खासदार विनायक राऊत यांनीही राहूल पंडित यांच्याशी संवाद साधत ते शिवसेनेतून जाणार नाहीत अशी ग्वाही दिली.

ज्येष्ठ जि. प. सदस्यावरही डोळे

भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी तालुक्यातील एका ज्येष्ठ आणि जुन्या शिवसैनिकाची भेट घेतली होती. संबंधित नेते हे जिल्हा परिषदेतील ज्येष्ठ सदस्य असून अंतर्गत राजकारणामुळे ते हळूहळू दूर्लक्षित आहेत. त्यांच्या भेटीबाबतचा तपशील अद्यापही गुलदस्त्यात आहे. शिवसेनेकडून नाराज असलेल्या जुन्या नेत्यांवर भाजपा नेत्यांची नजर असल्याचेच चित्र रत्नागिरीत दिसत आहे.

शिवसैनिक पक्षातून बाहेर पडणार नाहीत ; खासदार राऊत

ज्या पक्षाचा पंतप्रधान आहे, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सेनेच्या लोकांना पक्षात आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना कटोरी घेऊन भीक मागायला लागत आहे, असा आरोप करत कोणीही शिवसैनिक पक्षातून बाहेर पडणार नाही अशी ग्वाही शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राहुल पंडित यांच्या घरी जाऊन बैठक घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे पंडित शिवसेना सोडणार अशी जोरदार चर्चा रत्नागिरीत रंगली होती.

याबाबत खासदार राऊत म्हणाले, राहुल पंडित काय पण कुठलाही शिवसैनिक भाजपात जाणार नाही. पंडित हे हाडाचे शिवसैनिक आहे. कोणीही शिवसैनिक पक्ष सोडणार नाही. भाजपने शिवसैनिकांना पक्षात घेण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी पक्ष वाढवण्यापेक्षा तो सांभाळावा आधी त्यांनी पक्ष सांभाळण्याचे काम करावे. भाजपची केंद्रात सत्ता आहे. त्यांचा पंतप्रधान आहे. तरीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर डोळे ठेवून त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करत फिरावे लागत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते कट्टर आहेत. ते अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाहीत.

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com