esakal | रोज सहा हजार भाविकांना गणपतीपुळेत मिळणार दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

KOKAN

रोज सहा हजार भाविकांना गणपतीपुळेत मिळणार दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारपासून (ता. ७) सुरू होत आहेत. कोरोनामुळे घरी थांबलेले भक्त, पर्यटक दर्शनासाठी मंदिरांकडे वळणार असून, विविध देवींच्या मंदिरात गर्दी उसळू शकते. मंदिरे उघडल्यामुळे गणपतीपुळेतही पर्यटकांचा राबता वाढू शकतो. हे लक्षात घेऊन देवस्थानने कोरोनाचे नियम पाळत दर्शन रांगांमध्ये सहा फूट अंतरावर चौकोन रंगवले आहेत. ‘श्रीं’च्या मूर्तीपुढेही एकावेळी एकाला दर्शनास उभारता येईल, अशी व्यवस्था केली आहे. या पद्धतीने दिवसात सहा हजार पर्यटकांना दर्शन मिळू शकते

गेल्या काही दिवसांपासून दापोली, गणपतीपुळे, गुहागरसारख्या किनारी भागात जवळच्या जिल्ह्यातील पर्यटकांचा राबता सुरू आहे. हॉटेल-लॉजिंग व्यावसायिकांसह छोट्या-मोठ्या दुकानदारांचे दैनंदिन उत्पन्न आता सुरू होणार आहे. वीकेंडला जोडून सुट्या असल्याने मुंबई, पुण्यातील लोकांकडून निवासासाठी आरक्षणास सुरवात झाली आहे. गणपतीपुळेत दर्शन रांगेत दोन भक्तांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले आहे. दर्शनासाठी सकाळी ७ ते १२, दुपारी १ ते ६ आणि सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत मंदिर खुले राहील. मास्क, सॅनिटायझर अत्यावश्यक केले आहे. किनाऱ्यावर दुर्घटना घडू नये यासाठी जीवरक्षकांना सतर्क ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे पर्यटकांचा कल शनिवार, रविवारकडे अधिक राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: वाशिष्ठीभोवती भिंत धोक्याला निमंत्रण

देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी

घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे उघडत असल्यामुळे राजापूर-आडिवरेचे महालक्ष्मी मंदिर, चिपळूणमधील रामवरदायिनी, दापोलीतील चंडिका या मंदिरांमध्ये स्थानिकांसह चाकरमानी दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या ठिकाणीही देवस्थानकडून योग्य तयारी केली आहे.

मुंबई, पुण्यातील पर्यटकांकडून निवासासाठी लॉजची विचारणा सुरू झाली होत आहे. काही पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. वीकेंडला येणाऱ्यांची संख्या अधिक राहील.

- प्रमोद केळकर, व्यावसायिक

loading image
go to top