esakal | हा तर शिवसेनेचा विरोधाभास ;  प्रमोद जठार यांची टिका 
sakal

बोलून बातमी शोधा

Ex Bjp Distirct President Pramod Jathar Criticism On Shivsena

जामसंडे येथील भाजप पक्ष कार्यालयात जठार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, लक्ष्मण पाळेकर, योगेश पाटकर, संजना आळवे उपस्थित होते.

हा तर शिवसेनेचा विरोधाभास ;  प्रमोद जठार यांची टिका 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देवगड ( सिंधुदुर्ग ) - बिहार निवडणूकीत शिवसेना तेजस्वी यादव यांचे कौतुक करते, त्यांनी तेथील तरूणांना दहा हजार नोकऱ्या देण्याचे आश्‍वासित केले. मात्र कोकणातील सुमारे दीड लाख तरूणांना नोकऱ्या देणाऱ्या नाणार प्रकल्पाला शिवसेना विरोध करते हा विरोधाभास आहे. बिहारमध्ये शिवसेनेने हात दाखवून अवलक्षण केल्याची टीका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली. 

जामसंडे येथील भाजप पक्ष कार्यालयात जठार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, लक्ष्मण पाळेकर, योगेश पाटकर, संजना आळवे उपस्थित होते.

श्री. जठार म्हणाले, ""बिहारमध्ये मागीलवेळी भाजपचे 53 आमदार होते, आता 73 आले आहेत. पोटनिवडणूकीतही भाजपची सरशी झाली; मात्र शिवसेना खासदार संजय राऊत तेजस्वी यादव यांचे कौतुक करताना "मॅन ऑफ द मॅच' असा उल्लेख करतात. यादव यांनी स्थानिक तरूणांना रोजगार देण्याचे आश्‍वासित केले तर शिवसेना तरूणांचा असलेला रोजगार हिरावून नेते हा फरक आहे. त्यामुळे "आपले ठेवायचे झाकून...' अशी शिवसेनेची अवस्था आहे. 

श्री. जठार म्हणाले, इकोसेन्सेटिव्हची 2018 ची यादी निश्‍चित करण्याबरोबरच किमान पन्नास टक्‍के गावे यातून वगळावीत, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील सुमारे 23 रेल्वेस्थानकांच्या प्लॅटफॉर्म उभारणीसाठी 20 कोटी द्यावेत, कोकोनट बोर्ड ऑफ इंडिया यावर राज्यातील प्रतिनिधी म्हणून कोकणातील व्यक्‍तीची निवड करण्याची मागणी केली. 

बिहारमध्ये एनडीए सत्तेत आली असून पूर्वी ठरल्याप्रमाणे नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील; मात्र राज्यात शिवसेनेबरोबर तसे काही ठरलेच नसल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रश्‍नच नव्हता. भाजप बोलतो तसे करतो याची जाणीव शिवसनेने ठेवावी. 
- प्रमोद जठार  

 
 

loading image