शिवसेनेच 'हे' मंत्री करतात जादुटोणा; माजी आमदाराचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

दाभोळ - विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यातील वादाची दरी मात्र वाढत चालली आहे. दोघांकडून एकमेकावर जोरदार टीका होत आहे.

दाभोळ - विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यातील वादाची दरी मात्र वाढत चालली आहे. दोघांकडून एकमेकावर जोरदार टीका होत आहे.

दापोली येथे सुर्यंकांत दळवी यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास
कदम हे भगत असून ते जादूटोणा करत असल्याचा सनसनाटी आरोप केला. रामदास कदम बंगाली लोकांना सोबत घेऊन फिरत असल्याचेही दळवी यांनी यावेळी सांगितले.

एकेकाळी कोकणातील शिवसेनेचे संताजी धनाजी म्हणून ओळखले जाणाऱ्या या दोन मित्रांमध्ये आता वितुष्ट आले आहे.
 श्री. दळवी म्हणाले, विधानसभेत रामदास कदम यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड व्हावी यासाठी सर्व आमदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप सर्व आमदाराना देण्यास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितले होते. त्यांच्या आदेशानुसार रामदास कदम यांच्यासाठी आपण सेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला होता. त्यावेळी मी श्री. कदम यांचेकडे गेलो असता त्यांनी मला एक माणूस सोबत दिला. मला वाटले तो त्यांचा मित्र असेल. पण तसे नव्हते. त्याला घेऊन आत जा असे कदम यांनी मला सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार मी विधानभवनात गेलो. त्यानंतर त्या व्यक्तीने कदम यांच्या केबिनमध्ये १० ते १५ मिनिटे काहीतरी जादूटोणा केला. तेव्हा मला समजले तो जादूटोणा करणारा होता.

दळवी म्हणाले, काही वर्षांपूर्वी कदम यांनी जामगे येथील घराच्या गच्चीवर बंगाली जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीस बोलावले होते. अमावास्येच्या दिवशी तेथे त्यांनी  जवळपास एक टेम्पो भरतील इतके कोहाळे कापले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MLA Suryakant Dalvi comment on Minister Ramdas Kadam