ठाकरे कुटुंबीयांचे हात मदतीसाठी कधीच खिशात जात नाहीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 August 2019

सावंतवाडी - जिल्ह्यात पूरग्रस्तांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत करत असल्याचे भासविणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांचे हात कधीच खिशात जाणार नाहीत. ते दुसऱ्याकडून घेणार व आपण मदत दिल्यासारखे भासवणार. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा हा केवळ दिखावूपणा आहे, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी केली.

सावंतवाडी - जिल्ह्यात पूरग्रस्तांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत करत असल्याचे भासविणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांचे हात कधीच खिशात जाणार नाहीत. ते दुसऱ्याकडून घेणार व आपण मदत दिल्यासारखे भासवणार. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा हा केवळ दिखावूपणा आहे, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी केली.

माजी खासदार राणे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली या वेळी तालुकाध्यक्ष संजू परब, राजू बेग, सुधीर आरिवडेकर, उपसभापती संदीप नेमळेकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘‘आपल्या जिल्ह्यात पर्यायाने संपूर्ण कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना चर्चा मात्र सांगली, कोल्हापूरचीच आहे. कोकणातील नुकसानीचा आकडा लक्षात घेता येथून किमान पाचशे कोटी रुपयाची मागणी सरकारकडे होणे गरजेची होती; मात्र इथले राज्यकर्ते कमी पडले.’’

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात आज पंधरा दिवस उलटूनही आंबोलीसारखा घाट रस्ता बंद आहे; मात्र आंदोलने करून हा प्रश्‍न सुटेल याची अपेक्षा कोणी करू नये. आता येथील पालकमंत्रीच बदलणे हेच उद्दिष्ट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आहे.’’

श्री. राणे पुढे म्हणाले, ‘‘मदत ही सांगायची नसते; मात्र ठाकरे कुटुंबीय आज आपण मदत करत असल्याचे भासवित आहेत. त्यांचे हात कधीच खिशात गेले नाहीत. आज पूर ओसरून पंधरादिवस झाल्यावर येथे आदित्य ठाकरे येतात. शायनिंग मारून कोण नेता होत नाही.’’

आमदार नाईकांवर टीका
कुडाळ येथील आमदार वैभव नाईक यांच्या संवाद यात्रेबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘वैभव नाईक यांना आधी बोलतांच कुठे येते, ते लोकाशी संवाद काय साधणार?’’ आमदार नीतेश राणे यांनीही संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना परब हे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांना सातत्याने पक्षात काम करताना पाहायला आवडेल. भविष्यात त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, असे ते म्हणाले.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MP Nilesh Rane comment on Aditya Thackeray