esakal | ब्रिगेडिअर सावंत यांनी 'आप' चा राजीनामा का दिला?
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रिगेडिअर सावंत यांनी  'आप' चा राजीनामा का दिला?

कणकवली - माजी खासदार ब्रिगेडिअर सुधिर सावंत यांनी आम आदमी पक्षाचा राजिनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला पुन्हा ब्रेक लागला असून श्री. सावंत आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. 

ब्रिगेडिअर सावंत यांनी 'आप' चा राजीनामा का दिला?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली - माजी खासदार ब्रिगेडिअर सुधिर सावंत यांनी आम आदमी पक्षाचा राजिनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला पुन्हा ब्रेक लागला असून श्री. सावंत आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. 

प्रसिध्दी पत्रकात सावंत यांनी नमुद केले आहे, की मी व माझ्या सहकाऱ्यांनी "आप'मध्ये 12 जानेवारी 2018ला जिजाऊ जयंतीच्या दिवशी सिंदखेडराजा येथील मेळाव्यात जाहीर प्रवेश केला होता. "आप' हा भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा एकमेव पक्ष आहे, या विश्‍वासाने त्यामध्ये सामिल झालो होतो; पण पक्षात आल्यानंतर वेगळाच अनुभव आला. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला जात नाही आणि या पक्षात हुकुमशाही आहे. सप्टेंबर 2018 मध्ये दुर्गेश फाटक यांना महाराष्ट्राचे प्रभारी नेमले गेले. तेव्हापासून ते केवळ 2 वेळा महाराष्ट्रात आले आणि पक्षाच्या प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करून आपल्या चमच्यांना उच्च-पदावर नेमू लागले. याची तक्रार मी अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली.

त्यावेळी केजरीवाल म्हणाले, तुम्ही असताना दुर्गेश फाटकची काय गरज; पण दुर्गेश पक्षात गटबाजी करत राहिले आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना डावलून फक्त त्यांना ओळखणाऱ्या इंग्लिश भाषिक लोकांना नेमत राहिले. याचीही लेखी तक्रार केजरीवाल यांच्याकडे केली. हायकमांडकडून राज्यात पक्ष चालवण्याची हुकुमशाही पद्धत मंजूर नव्हती. 

सर्वात दुःखद बाब म्हणजे भ्रष्टाचार विरोधातील भूमिकेला फाटक आणि निवडक लोकांचा विरोध होता. 27 डिसेंबर 2018च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मिटिंगमध्ये भ्रष्टाचार हा मुद्दा राजकारणात राहीला नसल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले होते व कॉंग्रेस बरोबर युती करण्यासाठी अट्टाहास केला होता. भ्रष्टाचार हा मुद्दा नाही हे ऐकल्यावर धक्काच बसला. पुढे जाऊन राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या बरोबर जुळवून घ्या, असे सांगण्यात आले. पवार यांच्याच बरोबर जायचे असते तर "आप' मध्ये का आलो असतो? असा सवाल मी केला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करायला महाराष्ट्राला परवानगी नाकारण्यात आली, असा आरोपही त्यांनी या पत्रकातून केला आहे.  

 
 

loading image