सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघाचेअस्तित्व; वनविभागाकडून अधिकृत माहिती

जनावराची केलेली शिकार खाताना या पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे.
tiger
tigertiger
Updated on: 

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पट्टेरी वाघ असल्याचे आता सिद्ध झाले आहे. वनविभागाने लावलेल्या कॅमेरामध्ये पाळीव जनावरांची शिकार करताना या वाघाचे छायाचित्र कैद झाले आहे. काही दिवसांपूर्वी ‘ब्लॅक पॅंथर’चे अस्तित्व आढळून आले होते. त्यामुळे प्राणीप्रेमी सुखावले आहेत.

आंबोली-चौकुळ परिसरात यापूर्वी वाघाचे अस्तित्व दिसून आले होते. त्यानंतर कुडाळ तालुक्यात वाघेरी येथे काळ्या बिबट्याचे पिल्लू आढळून आले होते. त्यानंतर आता थेट वाघाचे दर्शन झाले आहे. कुडाळ तालुक्यातील वाघेरी येथे काही दिवसांपूर्वी ‘काळा बिबट्या’चे पिल्लू सापडून आले होते. या दुर्मिळ वाघाचे अस्तित्व सिद्ध झालेले असताना त्यानंतर आता जिल्ह्यात पट्टेरी ‘वाघा’चे दर्शनही घडले आहे. सावंतवाडी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एका पाळीव जनावराची केलेली शिकार खाताना या पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे.

जिल्ह्यात नुकताच कुडाळ तालुक्यात दुर्मिळ प्रजातीतील ‘काळा बिबट्या’ दिसून आला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील जंगल क्षेत्रामध्ये ‘वाघा’चा वावर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हा जैवविविधतेने संपन्न असल्याचे दिसून येते. वाघ हा प्राणी परिसंस्थेच्या सर्वोच्च स्थानावरील वन्यप्राणी असून, तो परिपूर्ण जंगलाचे प्रतीक म्हणूनही पाहिला जातो. जिल्ह्यातील या वनवैभवाचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांची वन्यप्राण्यांकडून शिकार झाल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा. जेणेकरून आपण शासनामार्फत नमूद केल्याप्रमाणे नुकसानभरपाई देता येईल. आपला हा समृद्ध वन वारसा जोपाण्यासाठी सावंतवाडी वन विभागासह आपण सर्व नागरिकही कटिबद्ध राहू, असे आवाहन सावंतवाडी वनविभागाचे उपवनरक्षक एस. डी. नारनवर यांनी केले आहे.

तिलारी संवर्धन राखीव, चंदगड संवर्धन राखीव, दोडामार्ग आंबोली संवर्धन राखीव, छत्रपती शाहू महाराज आजरा-बुदरगड संवर्धन राखीव, गगनबावडा संवर्धन राखीव, पन्हाळगड संवर्धन राखीव विशाळगड संवर्धन राखीव , हे एकीकडे राधानगरी वन्यजीव अभयारण्याला लागून आहेत तर एकीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्य व पुढे जोर जांभळी संवर्धन राखीव पर्यंत सलग लागून आहेत. भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ व इतर तरून भक्षी प्राणी हे त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करु शकतात हे अधोरेखित होते.

डॉ. व्ही. क्लेमेंट बेन,मुख्य वनसंरक्षक -कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com