esakal | दापोली आगारातून दिवाळीसाठी जादा फेऱ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Extra Round Trips From Dapoli Depot For Diwali

1 नोव्हेंबरपासून दापोली-मुंबई (शिवशाही) बस दापोलीतून दुपारी 3.30 तर मुंबईतून सकाळी 10 वा. सुटेल. दापोली-माटवण-बोरिवली दापोलीतून सकाळी 10.30 वा. तर मुंबईतून रात्री 9.30 वा. सुटेल.

दापोली आगारातून दिवाळीसाठी जादा फेऱ्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दाभोळ ( रत्नागिरी ) - दिवाळीनिमित्त दापोली आगारातून विविध मार्गांवर जादा फेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक रेश्‍मा मधाळे यांनी दिली आहे. यामध्ये दापोली - विरसई - मुंबई ही बस 24 ऑक्‍टोबरपासून सुरू केली असून ती दापोलीतून सकाळी 5.30 वाजता तर मुंबई येथून रात्री 9.45 वाजता सुटेल.

दापोली - नालासोपारा (शिवशाही) दापोलीतून रात्री 10.15 वाजता सुटेल तर नालासोपारा येथून सकाळी 8.30 वाजता सुटेल. दाभोळ-मुंबई ही बस दाभोळ येथून सकाळी 9.30 वा. तर मुंबई येथून सकाळी 6.30 वा. सुटेल. आंजर्ले-मुंबई ही बस आंजर्ले येथून सकाळी 7 वा. तर मुंबईतून रात्री 9.30 वा. सुटणार आहे.

1 नोव्हेंबरपासून दापोली-मुंबई (शिवशाही) बस दापोलीतून दुपारी 3.30 तर मुंबईतून सकाळी 10 वा. सुटेल. दापोली-माटवण-बोरिवली दापोलीतून सकाळी 10.30 वा. तर मुंबईतून रात्री 9.30 वा. सुटेल. दापोली-अक्‍कलकोट बस दापोलीतून सकाळी 9 वा. तर अक्‍कलकोट येथून सकाळी 10 वा. सुटेल. दापोली -शिर्डी ही बस दापोलीतून सकाळी 7 वा. तर शिर्डीतून सकाळी 8.30 वा. सुटेल.

11 नोव्हेंबरपासून दापोली-परळी ही बस दापोलीतून सकाळी 5.15 वा. सुटेल तर परळी येथून सकाळी 8.30 वा. सुटेल. दापोली-भाईंदर बस दापोलीतून रात्री 9.30 वा. सुटेल तर भाईंदर येथूनही ती रात्री 9.30 वा. सुटेल. दापोली-विठ्ठलवाडी बस दापोलीतून सकाळी 8.30 वा. तर विठ्ठलवाडी येथून रात्री सुटेल.

दापोली-पुणे-चिंचवड बस दापोलीतून दुपारी 1 वा. सुटेल तर चिंचवड येथून रात्री 10.30 वा. सुटेल. दापोली-पंढरपूर बस दापोलीतून सकाळी 6.15 वा. सुटेल तर पंढरपूर येथून सकाळी 9 वा. सुटेल. दापोली-नालासोपारा बस दापोलीतून सकाळी 9 वा. तर नालासोपारा येथून रात्री 9.30 वा. सुटेल. 
 

loading image