पाली - पाली शहरात बनावट पोलिसांच्या नावाखाली लुटणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच राम आळी परिसरात दोन अनोळखी इसमांनी पोलिस असल्याची बतावणी करत 69 वर्षीय वृद्ध महिलेला गंडा घालत तब्बल पन्नास हजार किमतीचे सोन्याचे दागिने बेमालूमपणे लंपास केले.