आंबोलीचा प्रसिद्ध धबधबा अडचणीत!

अमोल टेंबकर
रविवार, 24 जून 2018

प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली या प्रसिद्ध धबधब्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी कोल्हापूर बेळगाव गोवा आदी भागातून त्या ठिकाणी अनेक पर्यटक दाखल होतात. 

सावंतवाडी - वर्षा पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर कोरला गेलेला आंबोलीचा प्रसिद्ध धबधबा अडचणीत आला आहे. वरच्या दिशेने येणारा नैसर्गिक स्त्रोत कमी झाल्यामुळे दरवर्षी ओसंडून वाहणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे.

या प्रकाराची स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज आंबोलीत जाऊन धबधब्याला भेट दिली. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर उपस्थित होते. यावेळी वनविभागाने तिच्या पद्धतीने बंधारे बांधल्यामुळे हा प्रकार घडला असावा असे त्यांना स्थानिकांकडुन सांगण्यात आले. झालेला प्रकार चुकीचा असून या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.

प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली या प्रसिद्ध धबधब्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी कोल्हापूर बेळगाव गोवा आदी भागातून त्या ठिकाणी अनेक पर्यटक दाखल होतात. मात्र मे महिन्याच्या सुमारास धबधब्याच्या दिशेने येणारे पाण्याचे स्त्रोताच्या ठिकाणी बंधारे बांधून त्या ठिकाणचे पाणी अन्य ठिकाणी वळविण्यात आले आहे.

बंधारे बांधण्याचे हे काम वनविभागाकडून करण्यात आले आहे त्यामुळे ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याला पाणीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्री साळगावकर यांनी केली. भेटीदरम्यान गावकऱ्यांनी पाहणी केल्यानंतर उपस्थित केली याबाबतची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली ते म्हणाले, 'चुकीच्या पद्धतीने धबधब्याच्या वरील बाजूने बंधारे घालण्यात आल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. हा चुकीचा प्रकार आहे वर्षाकाठी अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. त्यामुळे पाणी ओसंडून वाहणे काळाची गरज आहे. या प्रकारची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याच्या मागे कोण चुकीच्या पद्धतीने काम केले याचा शोध घ्यावा, अशी मागणी करणार आहे.'

वर्षा पर्यटनासाठी आम्ही दरवर्षी आंबोली येतो. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याचा प्रवाह कमी आहे. जून महिना संपत आला तरी धबधब्याचा प्रवाह वाढला नाही. त्यामुळे नेमकं काय झालं, याचा शोध वनविभागाने घेणे गरजेचे आहे. - दिपाली हरमलकर, पर्यटक मळगाव

धबधबे नक्कीच वाहणार -
याबाबत वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक पुराणी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले व नव्याने बंधारे घातले आहे हे सत्य आहे. मात्र ती बंदरे भरल्यानंतर पाणी नेहमीप्रमाणे वाहणाऱ्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात माती वाहून जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी अडवण्याचा फायदा जंगलातील प्राण्यांना होणार आहे. तसेच जास्त काळ टिकण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: famous waterfall of Amboli in trouble