
Farmers harvesting paddy ahead of return rains — Diwali celebrations shift to the fields this year.
esakal
-अमित गवळे
पाली : रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. सध्या रायगड जिल्ह्यामध्ये भात पिके आता डोलू लागली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात भातकापनी च्या कामांना वेग आला आहे. दिवाळी असली तरी परतीच्या पावसाची भीती व मजुरांची कमतरता यामुळे धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी भात कापणी व झोडणीच्या कामांना शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना दिवाळीच्या आनंदाला मुकावे लागताना दिसत आहे.