तीनदा हमीपत्रे, तरीही भरपाई नाही 

Farmers in Padlos have not received compensation
Farmers in Padlos have not received compensation
Updated on

बांदा (सिंधुदुर्ग) - गतवर्षी ऑगस्ट व ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सावंतवाडी तालुक्‍यातील पाडलोस येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. भरपाई मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्याही झिझवल्या; परंतु हमीपत्राचे कारण पुढे करत प्रशासनाने बाजू मारून नेण्याचे काम केले. तरीही एक नव्हे, दोन नव्हे तब्बल तीन वेळा हमीपत्रे देऊनही भरपाई जमा न झाल्याने वंचित शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

पाडलोस गावातील सुमारे 114 शेतकऱ्यांच्या भातपीक व फळपीकांचे 3 लाख 89 हजार 280 रुपयांचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई मिळणार, असे सांगत प्रशासनाकडून केवळ कादगपत्रांचा खेळ सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अनेकदा तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिझवल्या; परंतु काही शेतकरी सोडले तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झाला नसल्याचे वंचित शेतकऱ्यांनी सांगितले. 

ऑगस्ट-ऑक्‍टोबर 2019 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कापणीयोग्य झालेले भातपीक जमीनदोस्त झाले होते. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून कृषी व महसूल विभागाने पिकांचे पंचनामेही केले; मात्र वर्षाचा कालावधी पूर्णत्वास आला तरीही काहींना भरपाई मिळाली नाही. प्रशासनाने भरपाईचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. 
- नंदा गावडे, माजी पंच तथा शेतकरी, पाडलोस 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Inspring Story Engineer Marries Farmer
Heavy rainfall in Raigad district pushed the Amba River above the danger level, disrupting traffic and prompting flood alerts.
Malvan primary school teacher transfer protest
When will Ratnagiri Airport start commercial flights?
Marathi News Esakal
www.esakal.com