शेतकऱ्यांनो कोकण पॅटर्न तुमच्या फायद्याचाच

farming new pattern of konkan launched in ratnagiri gives huge production in small size of land
farming new pattern of konkan launched in ratnagiri gives huge production in small size of land

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षात कोकणातील पारंपरिक भातशेतीकडील कल कमी झाला आहे. कोकणात गतवर्षीपर्यंत ३ लाख ४९ हजार ७०० हेक्‍टरवर लागवड झाली. यंदा ऑनलाईन नोंदणीत लागवडीखालील क्षेत्र ३ लाख ४५ हजार ४१९ नोंदले गेले. सुमारे पाच हजार हेक्‍टरने क्षेत्रात घट झाली. कृषी विभागाने क्षेत्र घटत असले तरीही उत्पादन वाढावे, यासाठी यांत्रिकीकरणासह अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणे वापरण्यावर भर दिला जात आहे. कमी जागेत, अधिक उत्पादनाचा कोकण पॅटर्न कृषी विभाग विकसित करत आहे.

भरपूर कष्ट, कमी होणारा नफा, मजुरांची टंचाई, रेशनवर मिळणारे स्वस्त धान्य यामुळे भाताखालचे क्षेत्र कमी होत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढविण्यावर भर देणे आवश्‍यक आहे. त्याकरिता उत्पादन खर्च कमी करण्याबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करावा, याचे प्रशिक्षण शेती शाळेतून सुरू आहे. सुधारित लागवड पद्धतीचा वापर योजनेत एसआरटी, चतुसूत्री व यांत्रिकीकरणाने भात लागवड होत आहे.

उत्पादन खर्च कमी करण्याकरिता शेतकऱ्यांनी स्वतःचे बियाणे तयार करणे, गादीवाफ्यावर सामूहिक रोपवाटिका, यंत्राद्वारे भात लागवड याबाबतचे पथदर्शी प्रयोग कृषी विभागाने सुरू केले. यांत्रिकीकरणामुळे भात लागवडीच्या सुधारित पद्धतीद्वारे लागवड होत आहे. बांधावर तूर, नाचणी लागवडीचे प्रयोग यशस्वी होत असल्याचे विकास पाटील यांनी सांगितले.


तीन हजार हेक्‍टरची घट

जिल्ह्यात २००९-२०१० ला ७७ हजार २०० हेक्‍टरवर भात लागवड होती. ती २०१९ ला ६७ हजार ८०० हेक्‍टरवर झाली. कोकण विभागीय कृषी सहसंचालकांनी घेतलेल्या ऑनलाईन आढाव्यात भात लावणी क्षेत्र ६४ हजार ३८६ हेक्‍टर आहे. सुमारे तीन हजार हेक्‍टरची घट दिसते. खरीपातील लागवडीचा तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्या पीक पाहणीचा अहवाल अजून कृषी विभागाकडून जाहीर झालेला नाही. त्यात जिल्ह्यातील लागवडीचा आकडा यंदा थोडा वाढू शकतो.

दृष्टिक्षेपात

- शेती शाळेतून सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार

- विविध वाणांच्या कॅफेटेरियाचे आयोजन

- माती परीक्षणावरील खत व्यवस्थापन प्रात्यक्षिके

- भात लावणी क्षेत्र ६४ हजार ३८६ हेक्‍टर

- तूर, नाचणी लागवडीचे प्रयोग यशस्वी

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com