

Woman Critically Injured as Container Rams Motorcycle on Mumbai–Goa Route
sakal
चिपळूण: मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे येथे भरधाव कंटेनरने मोपेडला जोरदार धडक दिल्याने बाप लेक ठार, तर पत्नी जखमी झाली आहे. कुणाल काशीराम आग्रे (वय ३५), मुलगी गार्गी कुणाल आग्रे (३) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. पत्नी गौरी कुणाल आने (३०, सर्व रा. वालोपे काजवेवाडी) जखमी आहेत. गार्गी जागीच ठार, तर वडिलांचा डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात मृत्यू झाला. पत्नी गौरी यांच्यावर उपचार सुरू आहेत. संजय विद्यानंद पांडे (उत्तरप्रदेश) या कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. हा अपघात रविवारी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.