कोकण रेल्वेने रत्नागिरीत आणले खत मात्र उतरवणार कोण...?

Fertilizer shortage in Ratnagiri district due to lack of labor
Fertilizer shortage in Ratnagiri district due to lack of labor
Updated on

रत्नागिरी : कोरोना चा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात असलेले परराज्यातील अनेक कामगार गावी परतले आहेत. त्याचा परिणाम जाणवत असून कोकण रेल्वेने रत्नागिरीत आलेले खत उतरवण्यास कामगारांची उणीव भासत आहे. त्यामुळे आरसीएफ कडून खत पाठवण्यात उशिर होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

समाधानकारक पाऊस सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील भात पेरणी ची कामे वेगाने सुरु आहेत. मात्र खताचा पुरवठा झालेला नसल्यामुळे  शेतकऱ्याची पंचाईत झाली आहे. खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. कोरोनातील लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांना बांधावर जाऊन खते, बियाणे उपलब्ध करुन द्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या; मात्र रत्नागिरीत अजूनही परिस्थिती गंभीर असून कृषी विभागाकडून यावर उपाययोजना करण्यात यश आलेले नाही.

मोसमी पाऊस सुरु झाला कि भात पेरणीची कामे वेगाने होतात. यंदा योग्य वेऴेस पावसाने आरंभ केला आहे. जिल्ह्यात भात शेतीचे क्षेत्र 67 हजार हेक्टर असून 10 ते 12 हेक्टरवर पेरणी केली जाते. पेरणी नंतर चार ते पाच दिवसात बहुतांशी शेतकरी रोप व्यवस्थित रुजून यावीत यासाठी युरिया, सुफला खत देतात. आतापर्यंत जिल्ह्यातील पेरणीची सुमारे 60 टक्केहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. पेरणी पूर्ण झाली तरीही खताचा पत्ता नसल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. 


जिल्ह्यातून खताची मागणी वेळेत करण्यात आली होती. मात्र त्याच वेळी कोरोनाने जिल्ह्यात पाय पसरायला सुरुवात केली  होती. काम नसल्यामुळं बहुतांशी परराज्यातील कामगार गावी परतले. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी या कामगारा अभावी कामे रखडली आहेत. अलिबाग तुर्भे येथून रत्नागिरी जिल्ह्यात युरिया आणि सुफला ही खते कोकण रेल्वे ने आणली जातात. पहिल्यांदा दोन गाड्यातुन सुमारे साडेचार हजार टन खत दाखल झाले. ते खत उतरवण्यासाठी मंजूर उपलब्ध नव्हते.  त्यामुळे गाडी बराच काळ रेल्वे स्थानकात उभी राहिली.  त्याचा भूर्दंड आरसीएफ कंपनीला बसला. रेल्वेला दंडाची रक्कम भरावी लागली.  त्यामुळे तिसरी गाडी पाठवण्यापूर्वी कंपनीने मंजूर उपलब्ध करून ठेवावे अशी सूचना कृषी विभागाला केली होती.

मात्र सुमारे आठवडाभर मजूर शोधण्यात वेळ गेला.  तोपर्यत भात लावणी सुरु झाली होती.  शेती सुरु झाली पण खत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. मंगळवारी 1300 मेट्रिक टन खत आले. ते उतरवण्यासाठी रत्नागिरी तहसीलदर यांनी मजूर व्यवस्था केली होती. सध्या शंभर मजूर रेल्वे स्थानकात उपलब्ध आहेत. आलेले खत तालुक्यात पाठवण्यात आले आहे. परंतु मागणीच्या तुलनेत खत कमी असल्यामुळे शेतकरी दुकानात गर्दी करु लागले आहेत. अशी परिस्थिती संगमेश्वर येथे दिसून आली.  संगमेश्वर येथील माजी कृषी सभापती  संतोष थेराडे यांनी  प्रशासकीय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,  शेतीची कामे सुरु झाली तरीही खत मिळत नाही.  अशी वेळ प्रथमच आली आहे. याबाबत गंभीर दखल घेतली पाहिजे.
खत टंचाई बाबत जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे म्हणाले कि मजूर नसल्यामुळे खताची गाडी आलेली नव्हती. यातून मार्ग काढण्यात आला आहे.  येत्या काही दिवसात खत पुरवठा सुरळीत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com