दिलासादायक ; रत्नागिरीतून डेंगी होतोय हद्दपार, यंदा एकही मृत्यू नाही

fever of dengue disease pass out from ratnagiri only one dead from this year
fever of dengue disease pass out from ratnagiri only one dead from this year
Updated on

रत्नागिरी : साथीच्या रोगात मोडणाऱ्या डेंगीने गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात थैमान घातले होते. मात्र, यंदा ही साथ आटोक्‍यात असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी डेंगीचे २२९ रुग्ण आढळले होते. मात्र, चालू वर्षात डेंगीचे केवळ २१ रुग्ण सापडले; तर एकही रुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातून डेंगी हद्दपारीच्या वाटेवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

जिल्ह्यात तापसरी, डेंगी, मलेरिया या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यात जिल्हा अजूनही कोरोनातून भयमुक्त झालेला नाही. मात्र, डेंगीच्या साथीची भीती कायम होती. ती आता काहीशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप विभागाकडून मोठ्या प्रमाणात डेंगीबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून डेंगीच्या निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम राबविले. माध्यमातूनही जनजागृती होताना दिसत आहे.

जिल्ह्यात २०१९ मध्ये डेंगीचे २२९ रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांवर वेळीच उपचार केल्याने एकही रुग्ण दगावला नव्हता. त्यानंतर जानेवारी २० पासून आतापर्यंत जिल्ह्यात ८० संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी डेंगीचे २१ रुग्ण मिळाले. त्यात स्थानिक १२ रुग्ण आणि स्थलांतरित नऊ रुग्ण आहेत. डेंगी हा ‘एडीस्‌ इजिटी’ या डासापासून होतो. डेंगी तापाकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. यासाठी गप्पी माशांची पैदास केंद्रे तयार केली आहेत.

खासगी रुग्णालयांतून चालढकल

जिल्ह्यात डास निर्मूलनाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच, डेंगीच्या रुग्णांबाबत खासगी रुग्णालयांनाही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांत डेंगीचा रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाला माहिती कळविली पाहिजे. मात्र, ती देण्यास चालढकल होते.  

"जिल्ह्यात इको फ्रेंडली डास निर्मूलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरडा दिवस पाळला जातो. त्याचबरोबर कंटेनर सर्वेक्षण करून पॉझिटिव्ह आढळून आल्यास तेथे कीटकनाशकांची फवारणी केली जाते."

- डॉ. संतोष यादव, जिल्हा हिवताप अधिकारी, रत्नागिरी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com