रत्नागिरी जिल्हा परीषदेच्या इमारतीसाठी साडेअठ्ठावन्न कोटी; विक्रांत जाधव

साडेपाच महिन्यांत प्रस्ताव मंजूर
vikrant jadhav
vikrant jadhavsakal
Summary

साडेपाच महिन्यांत प्रस्ताव मंजूर

रत्नागिरी : जिल्हा परिषद इमारतीसाठी(jilha parishad building) ५८ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष विक्रांत जाधव(vikrant jadhav) यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्यासह आमदार भास्कर जाधव (mla bhaskar jadhav)यांच्या अनुभवामुळे निधी मिळवून देणे शक्य झाले. प्रस्ताव तयार करून तो साडेपाच महिन्यांत मंजूर करवून आणण्यात जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्ष जाधव म्हणाले, झेडपीच्या सुसज्ज इमारतीचा नवीन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला. त्याला निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे(cm uddhav thakrey) यांनी कौतुकाची थाप दिली, तर उपमुख्यमंत्री पवार यांनी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे आश्‍वासन दिले. यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्यासह बांधकाम अधिकारी मठपथी, रचना महाडिक व अन्य कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्याच्या अंदाजपत्रकात ८४ कोटी रुपये जिल्हा परिषद इमारतीसाठी शिल्लक होते. आमदार जाधव यांनी उपमुख्यमंत्री

vikrant jadhav
आधी 'त्या' बोलेरो गाड्यांची थकबाकी भरा; सावंतांचा नितेश राणेंना टोला

पवार यांच्या रत्नागिरीच्या इमारतीला तुमच्याकडील निधी द्या, असा आग्रह धरला. उपमुख्यमंत्री यांनीही मिऱ्याच्या भाषणात भूमिपूजनाला येण्याचा केलेला उल्लेख ही तरुण अध्यक्षासाठी कौतुकाची थापच आहे. यावेळी उपाध्यक्ष उदय बने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी झाले होते.

vikrant jadhav
रत्नागिरी : मुरूडच्या साई रिसॉर्टला कारणे दाखवा नोटिस

अशी असेल नवीन इमारत

नव्या इमारतीची रचना बेसमेंट, तळमजला आणि त्यावर सहा मजले, अशी असेल. १० हजार ८० चौरस मीटरचे बांधकाम आहे. सर्व विभागांना स्वतंत्र कार्यालये, सर्वसाधारण सभांसाठी वेगळे सभागृह, उपाहारगृह, सुसज्ज महिला कक्ष, व्हिडिओ कॉन्फरन्स, समिती सभांसाठी दोन वेगवेगळी सभागृहे, पार्किंग व्यवस्था, लिफ्टची व्यवस्था यासह सामान्य प्रशासन, वित्त विभाग, बांधकाम, कृषी, समाजकल्याण, शिक्षण विभागांसाठी स्वतंत्र कक्ष असतील. नवीन किंवा जुन्या इमारतीमधील तळमजल्यात गाळे तयार करुन ते भाड्याने देण्याचा विचारही सुरू असल्याचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com