महामार्गावर अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; व्यावसायिकांची पोलिसांकडे मागणी

महामार्गालगत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी तसेच रिक्षा वाहतूकदारांनी मागणी केली आहे.
kokan
kokansakal

चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावर (mumbai- goa national highway)अपघात होऊन कोणाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महामार्गालगत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी तसेच रिक्षा वाहतूकदारांनी केली आहे. चिपळूण पोलिस ठाण्यात(chiplun police station) याबाबतचे निवेदन देण्यात आले. शहरातील गणपती मंदिर ते बहादूरशेखनाका मेनरोड सर्विस रोडचे खड्डे आठ दिवसात न भरल्यास चौपदरीकरणाचे काम थांबवण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. (File a case against the authorities in the event of an accident on the highway Demand of traders to the police)

आमदार शेखर निकम, राष्ट्रीय महामार्ग विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना आज व्यापारी व रिक्षा वाहतूकदारांनी निवेदन दिले. त्यात असे म्हटले आहे की दसऱ्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व खड्डे भरण्यात आले. अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे काम संबंधित ठेकेदारने केले. सगळीकडील रस्त्याचे काम पूर्ण झाले. परंतु, गणपती मंदिर ते बहादूरशेखनाका मेनरोड सर्विस रोडचे डांबरीकरण पूर्ण केले नाही. येथील व्यापाऱ्यांनी ठेकेदारांकडे चौकशी केली. अनेकवेळा विचारणा केली. पण गेली दोन महिने फक्त आश्वासन देण्यात आले. या वेळी नितीन लोकरे व रामशेठ रेडीज यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन खड्डे भरण्याची मागणी केली.

kokan
जळगाव : धुळे-सोलापूर महामार्गावर वर्षभराच्या अपघातांमध्ये पंधरा बळी

जीवितहानी झाल्यास अधिकारी, ठेकेदार जबाबदार

गणपती मंदिर ते बहादूरशेखनाका मेनरोड सर्विस रोडवरील कामाचा अजून पत्ता नाही. मातीच्या रस्त्यामुळे व्यावसायिकांचे व गाडी चालकांचे अतोनात नुकसान होत आहे. धुळीमुळे लोक आजारी पडत आहेत, वाहनांचे अपघात होत आहेत. या पुढे कोणताही अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच येत्या आठ दिवसांत डांबरीकरणाचे संबंधित ठेकेदाराने काम सुरू न केल्यास जनता केव्हाही कामबंद आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरेल, याची नोंद घ्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com