

Ichalkaranji Financial Fraud
esakal
इचलकरंजी: आर्थिक फसवणुकीच्या नैराश्येतून तरुण अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरज अरुण निर्मळे (वय ३४, इंदिरानगर, कोरोची) असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १३) लक्ष्मी इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या सतीश पाटील यांच्या शेतामधील खोलीत घडली. याबाबतची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे. तपासात पोलिसांना सूरज याच्या खिशात चिठ्ठी मिळाली आहे. त्यात सात कोटींच्या फसवणुकीच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आहे.