फिनोलेक्स अॅकॅडमीला टाईम्स इंजिनिअरिंग रॅकिंगच्या क्रमवारीत स्थान

फिनोलेक्स अॅकॅडमीला टाईम्स इंजिनिअरिंग रॅकिंगच्या क्रमवारीत स्थान

टाईम्स रॅकिंगच्या क्रमवारीत
फिनोलेक्स अॅकॅडमीला स्थान
रत्नागिरी, ता. २ : टाईम्स इंजिनिअरिंग रॅकिंग २०२४ सर्वेक्षणात फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीला भारतामधील उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १३१वे स्थान पटकावले आहे. महाराष्ट्रामध्ये २१वे व मुंबई विद्यापिठात १८वे स्थान पटकावले आहे.
दरवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाच्या आधारावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा ठरवला जातो. त्यासाठी यावर्षी देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून निवडक महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात महाविद्यालयाची मुलभूत माहिती, पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षक, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन, नोकरीतील संधी, विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व आणि नेतृत्वविकास घडवण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रयत्न, विद्यार्थ्यांना प्रदान केलेले शैक्षणिक वातावरण आणि शिक्षणातील स्रोत, ग्लोबल एक्स्पोजर, संशोधन अभिमुखता, महाविद्यालयाची माफक फी आणि औद्योगिक क्षेत्राशी महाविद्यालयाचा संपर्क या गोष्टींचा विचार करण्यात आला.
फिनोलेक्स समुहाचे अध्यक्ष (कै.) पी. पी. छाब्रिया यांच्या प्रेरणेतून हे महाविद्यालय उभे राहिले. महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग, आयटी, केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन हे पदवी अभ्यासक्रम, मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यात येते. मेकॅनिकल व आयटी या शाखांमध्ये पीएचडी अभ्यासक्रम चालवला जातो. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरूणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com