सिंधुदुर्गात `या` गावात बंद गॅरेजला लागली आग ; कारण अस्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

मसदे - आवळदेवाडी येथील आदित्या राऊळ यांच्या मालकीचे प्राईम ऑटोमोबाईल गॅरेज आहे. काल (ता. 11) दिवसभरात कामे आटोपून ते सायंकाळी 7 च्या दरम्यान गॅरेज बंद करून घरी गेले. उशिरा त्यांच्या गॅरेजला आग लागली. 

मालवण ( सिंधुदुर्ग) : मसदे-आवळदेवाडी येथील प्राईम ऑटोमोबाईल गॅरेजला आग लागली. यात आदित्य राऊळ यांचे साडेतीन लाखांचे नुकसान झाले. ही घटना काल (ता. 11) रात्री उशिरा घडली. या आगीत गॅरेजमधील स्पेअर पार्ट, इंजिन ऑईल व इतर साहित्य जळून खाक झाले. 

मसदे - आवळदेवाडी येथील आदित्या राऊळ यांच्या मालकीचे प्राईम ऑटोमोबाईल गॅरेज आहे. काल (ता. 11) दिवसभरात कामे आटोपून ते सायंकाळी 7 च्या दरम्यान गॅरेज बंद करून घरी गेले. उशिरा त्यांच्या गॅरेजला आग लागली. 

त्यांच्या समोरच असलेल्या पेट्रोल पंपावर असलेले कर्मचारी व वाडीतील ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग गॅरेज मालक आदित्य राऊळ यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधला. लगेचच आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले; मात्र या आगीमध्ये मोटर गॅरेजमधील इंजिन ऑईल स्पेअर पार्ट, टू व्हिलर, फोरव्हिलर बॅटरी, गियर फिल्टर शीट कव्हर रबर व इतर साहित्य आगीत भस्मसात झाले आहे.

आगीत एकुन साडेतीन लाखाचे नुकसान झाल्याची पंचयादी मसदे तलाठी जी. व्ही. कोरगावकर, ग्रामसेवीका एस. एस. देवरूखकर, पोलिस पाटील निनाद माडये यांनी केली आहे. मोटर गॅरेजमध्ये गेली सहा महिने वीज पुरवठा खंडित असुनही व आग कशामुळे लागली यांचे नेमके कारण समजू शकले नाही. 

गॅरेज मालक आदित्य राऊळ हे नुकतेच मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी झाले असून या अपघातात त्याचा हात निकामी झाला आहे. त्यातच नव्याने सुरू केलेल्या या मोटर गॅरेजचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. यातून सावरण्यासाठी शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळण्याची गरज आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire To Automobile Garage In Masade Awaledwadi Sindhudurg Marathi News