धाटाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीत आग

पराग फुकणे
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

धाटाव औद्योगिक वसाहतीतील सॅम्परट्रन्स निर्लाॅन या बहुराष्ट्रीय कंपनीत बाॅयलरजवळ आग लागली. ही आग आज सकाळी साडेआठच्या सुमारास लागली. 

रोहा (जिल्हा रायगड) : धाटाव औद्योगिक वसाहतीतील सॅम्परट्रन्स निर्लाॅन या बहुराष्ट्रीय कंपनीत बाॅयलरजवळ आग लागली. ही आग आज सकाळी साडेआठच्या सुमारास लागली. 

या बहुमजली इमारतीत आग लागल्याने ही आग आटोक्यात आणणे अवघड झाले होते. धाटाव औद्योगिक वसाहत, रोहा नगरपालिका, सुप्रीम पेट्रोकेम, रिलायन्समधून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी झाले. सुमारे दोन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.

Web Title: Fire at Dhatav Industrial estate company