esakal | दोडामार्ग बाजारपेठेतील आगीत सहा दुकाने खाक
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्ग बाजारपेठेतील आगीत सहा दुकाने खाक

दोडामार्ग - येथे शहरातील बाजारपेठेत काल रात्री अडीचच्या सुमारास शाँटशर्किटमुळे आग लागली. या आगीत बाजारपेठेतील दुकाने भस्मसात झाली आहेत. 

दोडामार्ग बाजारपेठेतील आगीत सहा दुकाने खाक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दोडामार्ग - येथे शहरातील बाजारपेठेत काल रात्री अडीचच्या सुमारास शाँटशर्किटमुळे आग लागली. या आगीत बाजारपेठेतील दुकाने भस्मसात झाली आहेत. 

दोडामार्ग मुख्य बाजारपेठेतील सावंतवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे. राजेंद्र बोंद्रे,आनंद बोंद्रे यांच्या इमारतींचेही या आगीत नुकसान झाले आहे. या इमारतीमध्ये भुसारी दुकान, मिठाई दुकान, स्टेशनरी दुकान ,कपडे इस्त्री दुकान, ब्युटी पार्लर, शिलाई मशीन अशी सहा दुकाने होती. हेरेकर, पांंडुरंग बोर्डेकर, सुधीर नाईक, संंदेश म्हावळणकर यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच दक्षता बाळगत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. डिचोली गोवा तसेच वेंगुर्ले येथून अग्निशामक बंब मागवण्यात आले होते. 

loading image