esakal | ब्रेकिंग; लोटे एसआयडीसीतील एम.आर. फार्मा कंपनीत स्फोट

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग; लोटे एसआयडीसीतील एम.आर. फार्मा कंपनीत स्फोट
ब्रेकिंग; लोटे एसआयडीसीतील एम.आर. फार्मा कंपनीत स्फोट
sakal_logo
By
सिध्देश परशेट्ये

खेड (रत्नागिरी) : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत आज पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. येथील एम. आर. फार्मा कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरुन प्राप्त झाली आहे. ही घटना आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली आहे. कंपनीमध्ये केमिकल प्रक्रीया सुरु असताना हा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्फोटाची माहिती मिळताच खेड नगरपालिका आणि औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. यामध्ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नसुन, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

हेही वाचा: कुत्र्याचा कामगारावर हल्ला, मालकावर गुन्हा; रत्नागिरीतील घटना