esakal | खेर्डीतील थ्री एम पेपर मिलच्या कचरा डेपोला आग
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग : खेर्डीतील थ्री एम पेपर मिलच्या कचरा डेपोला आग

ब्रेकिंग : खेर्डीतील थ्री एम पेपर मिलच्या कचरा डेपोला आग

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : खेर्डी एमआयडीसीतील थ्री एम पेपर कंपनीच्या कचरा डेपोला आज दुपारी चार वाजता आग लागली. या आगीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे. या धुरामुळे वाहनधारकांना त्रास होऊ लागला. पूर्ण खेर्डी गावावर धुराचे ढग तयार झाले होते. अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सुदैवाने या घटनेत मनुष्य हानी झालेली नाही.

लोटेतील समर्थ केमिकल कंपनीला आज सकाळी साडेनऊ वाजता आग लागली. ही आग शांत होत असतानाच सांयकाळी खेर्डीतील थ्री एम पेपर मिलच्या कचरा डेपोला आग लागल्याची घटला घडली. खेर्डी एमआयडीसीमध्ये वाशिष्ठी नदीपासून काही अंतरावर थ्री एम पेपर मील आहे. कंपनीच्या एका बाजूने कोकण रेल्वेचा मार्ग आहे. त्या परिसरात कंपनीचा कचरा डेपो आहे. त्यामध्ये प्लास्टिकचा साठा मोठ्या प्रमाणावर होता. या कचरा डेपोला दुपारी चार वाजता आग लागली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र खेर्डी परिसरात धुराचे मोठे लोट सर्वत्र पसरले. त्यानंतर थ्री एम पेपर मीलच्या कचरा डेपोला लाग लागल्याचे समजले.

सव्वाचार वाजता संपूण खेर्डी गावावर धुराचे ढग तयार झाल्यासारखे चित्र होते. खेर्डी परिसरातील नागरिक आग पाहण्यासाठी कंपनीच्या आवारात दाखल झाले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही कंपनीच्या प्रवेशद्वारातून आत सोडण्यात आले नाही. संचार बंदी असताना परिसरातील नागरिक एकत्र जमले होते. कंपनीच्या मागील बाजू कचरा डेपो असल्यामुळे नागरिक रस्त्यावर उभे राहून धुराचे लोट पाहत होते. थ्री एम पेपर मिलच्या समोरच खेर्डी पोलिस ठाणे आहे.

आगीची माहिती मिळताच पोलिस कर्मचरी घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे नागरिकांची गर्दी कमी झाली. प्लास्टिकमुळे हवेचे प्रदुषण तयार झाले. परिसरात विशिष्ठ प्रकारची दुर्गंधी पसरली. त्याचा त्रास तेथे उपस्थितांपैकी काहींना झाला. आगीची तीव्रता वाढल्याने आजूबाजूचा कचरा त्याच्या कचाट्यात सापडला. स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.