नेरळ : शेतकऱ्याने साठवण केलेला पेंढा, लाकडे जाळून खाक

संतोष पेरणे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

कुरुंग गावातील शेतकरी ग्रामस्थ रामचंद्र भोईर यांनी पावसाळ्यात आपल्या जनावरांचा चारा साठवून ठेवला होता.त्यात भाताच्या 1200 मोळ्या आणि सरपणासाठी लाकडे आणि शेणाच्या गोऱ्या गोळा करून ठेवल्या होत्या. गावाच्या बाहेर अनेक वर्षे सुरक्षित असलेल्या त्या भाताच्या मोळ्या आणि लाकडे तसेच शेणाच्या गोऱ्या यांना 23 एप्रिलच्या रात्री अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमध्ये लक्ष्य केले.

नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत मधील कुरुंग येथील एका शेतकऱ्याचे अज्ञात व्यक्तींनी लागलेल्या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्यासाठी साठवण करून ठेवलेली लाकडे आणि भाताच्या मोळ्या यांना आग लावल्याने शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून साधारण 1 लाख रुपयांचे नुकसान या अचानक लागल्याने आगीमध्ये झाले आहे.

कुरुंग गावातील शेतकरी ग्रामस्थ रामचंद्र भोईर यांनी पावसाळ्यात आपल्या जनावरांचा चारा साठवून ठेवला होता.त्यात भाताच्या 1200 मोळ्या आणि सरपणासाठी लाकडे आणि शेणाच्या गोऱ्या गोळा करून ठेवल्या होत्या. गावाच्या बाहेर अनेक वर्षे सुरक्षित असलेल्या त्या भाताच्या मोळ्या आणि लाकडे तसेच शेणाच्या गोऱ्या यांना 23 एप्रिलच्या रात्री अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमध्ये लक्ष्य केले. रात्री अचानक लागलेल्या आगीबद्दल शेतकरी रामचंद्र भोईर यांना कळल्यावर त्यांचे कुटुंबीय हे मोळ्या ठेवलेल्या ठिकाणी धाव घेतली,पण भाताच्या मोळ्या,शेणाच्या गोऱ्या,लाकडे हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांना वाचवता आले नाही.

साधारण 1200 भाताच्या मोळ्या आणि लाकडे यांचे आर्थिक नुकसान हे किमान एक लाख रुपयांचे झाले असून त्याबाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मोहिते यांनी कुरुंग येथे धाव घेतली.मोहिते यांनी नंतर नायब तहसीलदार संजय भालेराव यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली.शेतकरी रामचंद्र भोईर यांनी या नुकसानीबद्दल नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन रीतसर तक्रार केली आहे.महसूल विभागाने आगीबाबत पंचनामा केला असून झालेल्या नुकसानीबद्दल वारे ग्रामपंचायत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire in Neral