प्रेयसीच्या पित्याचा गोळी झाडून खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

प्रेयसीशी लग्न करण्यास तिच्या पित्याने नकार दिल्याच्या रागातून झालेल्या वादात तरुणाने प्रेयसीच्या पित्याचा पिस्तूलने गोळी झाडून खून केला. रत्नागिरी तालुक्‍यातील कोतवडे येथे हा प्रकार घडला.

रत्नागिरी - प्रेयसीशी लग्न करण्यास तिच्या पित्याने नकार दिल्याच्या रागातून झालेल्या वादात तरुणाने प्रेयसीच्या पित्याचा पिस्तूलने गोळी झाडून खून केला. रत्नागिरी तालुक्‍यातील कोतवडे येथे हा प्रकार घडला.

गुरुवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी पहाटे त्याला रेल्वे स्थानकात जेरबंद केल्याचे निरीक्षक सुरेश कदम यांनी सांगितले. संशयिताला न्यायालयाने 22 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

भिकाजी कृष्णा कांबळे (वय 43, रा. वेतोशी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भिकाजी हे घरी जात असताना वेतोशी मार्गावरील घारपुरेवाडी येथे आलिशान कारमधून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची होऊन रिव्हॉल्व्हरने त्यांच्यावर गोळी झाडली. कांबळे यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing Murder Crime