चिपीत पहिले विमान उतरणार 12 सप्टेंबरला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

मालवण - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. खासदार राऊत यांनी बीएसएनएल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी या विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली. 

पाट-परुळे -चिपी रस्ता साडेपाच मीटर रुंद करणे, बीएसएनएल थ्रीजी टॉवर सुरू करणे, कुंभारमाठ ते चिपी वीज वाहिनी टाकणे, पाट व केळूस गावातील तलावातून पाणी चिपीला पुरवठा करणे, धावपट्टी अडीच किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, पुढील एक किलोमीटरची धावपट्टी नियोजित आहे. नोव्हेंबर पर्यंत किरकोळ असलेले विमानतळाचे काम पूर्ण करून नियमित विमान वाहतूक सुरू होईल, असे सांगण्यात आले. 

जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर, सुनील देसाई, जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब, तालुका प्रमुख बाळा दळवी सभापती बाळा परब, प्रसाद मोरजकर, सुकन्या नरसुले, सोमा घाडीगांवकर, योगेश तावडे, केळुस सरपंच, कोचरा सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first plane will land on 12 September in Chipi