esakal | तीन हजार नौका समुद्रात जाण्यास सज्ज; उद्यापासून मासेमारी सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Matil Wale Breaks In Ratnagiri Fishing Ratnagiri Kokan Marathi News

जिल्ह्यात बंदी कालावधीमध्ये ९ मासेमारी नौकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३ रत्नागिरी तर ६ मुंबईच्या नौका होत्या.

तीन हजार नौका समुद्रात जाण्यास सज्ज; उद्यापासून मासेमारी सुरू

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्ह्यात उद्यापासून (ता. १) मासेमारी सुरू (Fishing) होणार आहे. दोन महिन्याच्या कालावधीनंतर मच्छीमारी नौका समुद्रात झेपावणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी मच्छीमारांनी केली आहे. अजूनतरी मासेमारीसाठी वातावरण अनुकूल नसल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे. मच्छीमारांनी २ तारखेपर्यंच वाट पाहून हवामानाचा अंदाज घेऊन मासेमारीसाठी समुद्रात जावे, असे आवाहन मत्स्य विभागाने (Department of Fisheries)केले आहे. (Fishing-starts-Action-against-9-fishing-boats-during-detention-period-ratnagiri-news-akb84) बंदी आदेश मोडणाऱ्या ९ नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ३ रत्नागिरीतील असून बंदी आदेशाचे १०० टक्के पालन झाल्याचे मत आहे.

पावसाळी मासेमारी बंदी १ जूनपासून सुरू होते. परंतु यंदा तौक्ते चक्री वादळामुळे १४ मे पूर्वीच सर्व मच्छीमार नौका बंदरात आणि जेटीवर नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. चक्रीवादळात जो मुसळधार पाऊस सुरू झाला तो तसाच पुढे सुरू झाला. त्यामुळे मासेमारी हंगामातील १५ दिवस वाया गेले होते. इतकेच नव्हे तर मासेमारीच्या हंगामातील दोन महिने अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नौका समुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे मच्छीमारांना मागील हंगाम तोट्यातच गेला.

हेही वाचा: समुद्रावर स्वार होण्यासाठी सावकारांकडे हात पसरायची आलीय वेळ

ट्रॉलिंग, गिलनेट, हुकने मासेमारी करणाऱ्या नौकांसह यांत्रिकी, बिगर यांत्रिकी नौकांची मासेमारी १ आॉगस्टपासून सुरू होत आहे. अशा ३ हजार २३९ नौका असून उद्यापासून या नौका मासेमारीसाठी समुद्रात जाण्यास सज्ज आहेत. नौकांची आवश्यक असलली किरकोळ दुरुस्ती करून घेण्याची धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यात ४६ मासळी उतरवण्याची केंद्र आहेत तर १ सप्टेंबरपासून पर्ससिन नेट सुरू होणार आहेत. या २४८ परवानाधारक पर्ससिननेट आहेत.

मासेमारी बंदीमुळे मासळीचे दर चांगलेच वधारले होते तसेच खवय्यांची गैरसोय होत होती; मात्र आता नवा मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर मासळीचे दर आवाक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे पापलेट, सुरमई, सरंगा अशी दर्जेदार मासळी खवय्यांना खायला मिळणार आहे.

जिल्ह्यात बंदी कालावधीमध्ये ९ मासेमारी नौकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३ रत्नागिरी तर ६ मुंबईच्या नौका होत्या. बंदी आदेश मच्छीमारांनी १०० टक्के पाळला; मात्र उद्या मासेमारी बंदी उठत असली तरी २ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा आहे. मच्छीमारांनी दोन दिवस वाट पाहून नंतर मासेमारीसाठी समुद्रात जावे.

- एम. व्ही. भादुले, सहाय्यक मत्स्य आयुक्त रत्नागिरी जिल्हा

loading image
go to top