कोकणच्या दाम्पत्याची भरारी ; देशातील तिसरे दाम्पत्य

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

सावंतवाडी - खारेपाटण - सावंतवाडी हे २०० किमीचे अंतर १३.५ तास या निर्धारित वेळेत पूर्ण केले आहे.

चिपळूण : येथील सायकलिंग क्‍लबच्या सायकलिस्टमुळे गेल्या काही दिवसांपासून चिपळूणचे नाव हे सातत्याने जिल्ह्याबाहेर झळकत आहे. या क्‍लबच्या आणखी पाचजणांनी सावंतवाडी - खारेपाटण - सावंतवाडी हे २०० किमीचे अंतर १३.५ तास या निर्धारित वेळेत पूर्ण केले आहे. यात धनश्री श्रीनिवास गोखले या महिलेचाही समावेश राहिला आहे.

चिपळूण सायकलिंग क्‍लबमधील धनश्री गोखले, श्रीनिवास गोखले, डॉ. स्वप्नील दाभोलकर, डॉ. तेजानंद गणपत्ये, ओंकार भालेकर यानी स्पर्धेत सहभाग घेतला. या पाचहीजणांनी २०० किमी बीआरएम स्पर्धेत भाग घेऊन २०० किमीचे अंतर दिल्या गेलेल्या १३.५ तासाच्या आत पूर्ण केले. ही स्पर्धा सावंतवाडी - खारेपाटण - सावंतवाडी या मार्गावर घेतली होती.

हेही वाचा - ब्रेकिंग - अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा झाला लिलाव ; सर्वाधिक बोली लावून स्थानिकांकडून खरेदी -

यामध्ये एकूण २३ स्पर्धक सहभागी झाले होते. विशेष कौतुकाची बाब म्हणजे या २३ स्पर्धकांमध्ये चिपळूणमधून धनश्री गोखले ही एकमेव महिला स्पर्धक सहभागी झाली होती.२०० किमी बीआरएम स्पर्धेत सहभाग नोंदवून तो पूर्ण करण्याचा रत्नागिरी जिल्ह्यांमधून प्रथम मान मिळवणारी महिला चिपळूणची आहे.

भारतातील पती-पत्नीची तिसरी जोडी

या स्पर्धेतील आणखी एक कौतुकाची बाब अशी की, गोखले परिवाराची जोडी ही भारतातील तिसरी अशी नवरा-बायकोची जोडी आहे, ज्यांनी एकत्र बीआरएम स्पर्धा या सायकल प्रकारावर पूर्ण केली आहे. पूर्ण भारतात फक्त तीनच अशा जोड्या आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five people with one couple in cycling within 13 hours cross 200 kilometers in chiplun konkan