
मंडणगड (रत्नागिरी) : भिंगळोली येथे जमाव करून एकास मारहाण केल्याप्रकरणी पाचजणांवर मंडणगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात असलम रफिक कोंडेकर (वय ३४, व्यवसाय वाहनचालक, रा. पिंपळगाव, मंडणगड) यांनी फिर्याद दिली आहे. मजहर पोशिलकर (रा. रेवतळे), सोमनाथ, रोहित भगत, अनिरुद्ध शिंदे, विशाल पडवळ (सर्व रा. मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. असलम कोंडेकर आणि संशयित एकमेकांचे परिचित आहेत.
३० जानेवारीला दुपारी तीनच्या सुमारास असलम कोंडेकर भिंगळोली येथील साईकृपा गॅरेजमध्ये गाडीचे काम करून घेत होते. त्यावेळी त्यांना मारहाण झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गॅरेजमध्ये गाडीचे काम सुरू असताना पांढऱ्या रंगाची मोटारीतून पाच संशयित आले. त्यांनी असलम यांना ‘तुझ्याजवळ काम आहे. तू गाडीत बस’, असे सांगितले. त्यावर असलम यांनी मी गाडीत बसणार नाही. तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते इथेच बोला, असे सांगितले. यावर संशयितांनी त्यांना धक्काबुक्की करून गाडीत बसला नाहीस तर तुला इथेच ठार मारीन, अशी धमकी दिली. त्यावेळी असलम यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - वाफोली धरणाला गळती, पाईपलाईन फुलटी -
मात्र संशयितांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी हातापायावर मारहाण केली. तसेच गाडीतील लोखंडी रॉड काढून असलम यांच्या डोक्यावर मारला. तसेच काठीने कानावर, डोक्यावर, पोटावर, पाठीवर मारहाण केली. याप्रकरणी असलम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांविरुद्ध मंडणगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास प्रभारी पोलिस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मोरे करीत आहेत.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.