पाली - सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा अंबा नदीला 23 जुलै 1989 रोजीच्या मध्यरात्री महापूर आला होता. या महापुराला गुरुवारी (ता.24) 36 वर्षे पुर्ण झाली. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील या महापुरात गतप्राण झालेल्या 80 ग्रामस्थांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणुन बांधण्यात आलेल्या स्मृती स्तंभाला ग्रामस्थ, शासकीय अधिकारी व विद्यार्थ्यांतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.