#KonkanRains चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात पूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

  • सलग तिसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याचा वेढा चिपळूण शहराला. 
  • चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात पूर
  • वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बहादुरशेख पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद
  • मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

 

चिपळूण - सलग तिसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याचा वेढा शहराला राहिला आहे. चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात पूर भरला असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बहादुरशेख पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. चिपळूणातील नागरिकांना तब्बल आठवेळा पुराचा सामना करावा लागला आहे.   

वाशिष्ठी, शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर चिपळूण बाजारपेठेत हळूहळू पाणी शिरण्यास सुरुवात होते. जुने बस स्थानक, चिंचनाका, अनंत आईस फेक्ट्री, वडनाका, वेस मारुती मंदिर, बहादूरशेख नाका, तर जुना बाजारपूल परिसर तसेच खेर्डी परिसरात पाणी साचते. ही परिस्थिती गेली काही दिवस सुरू आहे. चिपळुणात तब्बल आठवेळा पाणी भरले आहे. तर आता सलग तीन दिवस चिपळूणला पुराचा वेढा बसला आहे.

पुराचे पाणी चिपळूण व खेर्डी बाजारपेठेतील दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. आज मंगळवारी तिसऱ्या दिवशी पुराचे पाणी कायम राहिल्याने चिपळूण तिसऱ्या दिवशी ठप्प झाले आहे. तर ग्रामीण भागात पडझडीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. यामुळे ग्रामीणवासीय देखील हैराण झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood situation in Chiplun