आंबोलीत उगम झालेली, पूर्वेकडे वाहणारी एकमेव नदी माहिती आहे का?

आंबोलीवरून आजरा रामतीर्थ तेथून गडहिंग्लजवरून कर्नाटकात मोठी नदी वाहते
आंबोलीत उगम झालेली, पूर्वेकडे वाहणारी एकमेव नदी माहिती आहे का?

आंबोली : येथे तीन दिवस मुसळधार पाऊस लागत असल्याने पावसाने झोडपून काढले आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. जिल्ह्यातील आंबोली येथे उगम पावणारी हिरण्यकेशी ही एकमेव नदी पूर्वेकडे वाहत जाते.

आंबोलीवरून आजरा रामतीर्थ तेथून गडहिंग्लजवरून कर्नाटकात मोठी नदी वाहते. आंबोलीतील सर्व पाणी या नदीतून वाहत जाते. चौकुळमधून घटप्रभा नदीला आणि जांबरे धरणातून पाणी जाते. मुशीपासूनचे पाणी वरच्या भागातून धबधब्याच्या प्रवाहातून घाटातून ते दाणोलीमार्गे तेरेखोल नदीतून समुद्राला मिळते. आंबोली हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे सर्वाधिक पाऊस असणारे ठिकाण आहे. जगात सर्वांत जास्त पाऊस हिमालयात मौसिंरम येथे त्यानंतर चेरापुंजी येथे पडतो.

आंबोलीत उगम झालेली, पूर्वेकडे वाहणारी एकमेव नदी माहिती आहे का?
चालत्या मोटरसायकलवर झाड कोसळून आज्जी-नातवाचा मृत्यू

२०१९ मध्ये ४३५ इंच पाऊस पडुन त्यावर्षी आंबोलीच्या पावसाने विक्रम केला होता. गेल्यावर्षी ही साधारण ४२४ इंच पाऊस होवून रेकॉर्ड झाले होते. साधारण ४०० इंचाची पावसाची सरासरी ही ३० वर्षांपूर्वी होती. गेली २५ वर्षे ही साधारण सरासरी ३०० ते ३५० इंचाच्या दरम्यान आहे गेली २ वर्षे वगळता. आंबोलीतील पाऊस जून ते ऑक्टोबर पर्यंतचा मोजला जातो. त्यामुळे मेमध्ये झालेला पाऊस मोजला गेला नाही. सध्या आंबोलीत मुसळधार पाऊस होत आहे. वारा सुटल्याने विजेचा खेलखंडोबा होत आहे. यावर्षी पर्यटक नसल्याने आंबोली पूर्वीची वाटत आहे.

यंदा जास्त पाऊस शक्य

गेल्यावर्षी जूनमध्ये केवळ ३९ इंच पाऊस होवून जुलैमध्ये मुसळधार पाऊस झाला होता मात्र यावर्षी ४ दिवस उशिरा पाऊस सुरू होवून आतापर्यंत ५० इंच पाऊस झाला आहे.त्यामुळे यावर्षी जून मध्ये शतक (दरवर्षीप्रमाणे) होवून पाऊस सरासरी एवढा पडणार आहे.असा अंदाज व्यक्त होत आहे. दोन वर्षे पाऊस नोव्हेंबर महिन्यापर्यंत पडल्याने समस्या झाल्या होत्या. मात्र यावर्षी पाऊस ३०० इंचाच्या दरम्यान होणार असल्याचा अंदाज आहे.

आंबोलीत उगम झालेली, पूर्वेकडे वाहणारी एकमेव नदी माहिती आहे का?
PHOTO : लग्नाची तारीख जवळ येतेय? 'अशी' चेकलिस्ट हवीच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com