चालत्या मोटरसायकलवर झाड कोसळून आज्जी-नातवाचा मृत्यू

 चालत्या मोटरसायकलवर झाड कोसळून आज्जी-नातवाचा मृत्यू

गडहिंग्लज (कोल्हापूर) : चालत्या मोटरसायकलवर झाड कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. गडहिंग्लज-आजरा (Gadhinglaj-Ajra)मार्गावरील निसर्ग हॉटेलजवळ ही दुर्दैवी घटना घडली. सतीश जोतीबा शिंदे(satish shinde) (36, रा. अत्याळ, ता. गडहिंग्लज) व सोनाबाई पांडूरंग जाधव (Sonsbai jadhav)(वय 75, रा. लिंगनूर कसबा नूल, ता. गडहिंग्लज) अशी मृतांची नावे आहेत. मृत नात्याने आज्जी-नातू आहेत. आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.(tree-collapsed-dies-grandmother-granddaughter-case-in-gadhinglaj-kolhapur-news)

सतीश येथील एका खासगी शोरुममध्ये कामाला आहे. गुरुवारी (ता.17) सायंकाळी त्याने आजोळी लिंगनूर येथील आज्जी सोनाबाई यांना अत्याळला घेऊन गेला होता. आज सकाळी कामावर येताना आजीला लिंगनूरला सोडण्यासाठी घेऊन येत होता.

दरम्यान, निसर्ग हॉटेलजवळ चालत्या मोटरसायकलवर झाड कोसळले. यात डोकीला मार लागल्याने सतीशचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरीकांनी जखमी सोनाबाई यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सतीश अविवाहित होता. त्याच्या मागे आई आहे. वडीलांचे सहा महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. तर सोनाबाई यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com